BJP Leader Savio Rodrigues Dainik Gomantak
गोवा

गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्सबार बंद करण्याची वेळ आलीये; भाजप नेत्याचे वक्तव्य

Illegal nightclubs in Goa: खुलेआम सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे हडफडे येथील नाईटक्लब सुरु होता, याच भ्रष्टाचारामुळे २५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे मत सावियो यांनी यापूर्वी नोंदवले होते.

Pramod Yadav

पणजी: "गोव्यात नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, राज्यातील सर्व बेकायदेशीर नाईटक्लब आणि डान्सबार बंद करण्याची वेळ आली आहे", असे मत भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी मांडले आहे. राज्यातील हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेनमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील बेकायदेशीर क्लब आणि तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी याप्रकरणी भाष्य करताना राज्यातील बेकायदेशीर नाईटक्लब बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे. बर्च बाय रोमिओ लेनमध्ये गैरव्यवस्थापनामुळे आग लागून २५ जणांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी क्लबचे मालक लुथरा बंधुंना थायलंडमधून अटकही करण्यात आली आहे.

खुलेआम सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे हडफडे येथील नाईटक्लब सुरु होता, याच भ्रष्टाचारामुळे २५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे मत सावियो यांनी यापूर्वी नोंदवले होते. याकडे त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचेही लक्ष वेधले होते.

यानंतर सावियो यांनी बेकायदेशीर नाईटक्लब आणि डान्स बार बंद करण्याची मागणी केली आहे.

"गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही. राज्यातील सर्व बेकायदेशीर नाईटक्लब आणि डान्स बार बंद करण्याचा वेळ आली आहे. व्यसनाचे अड्डे ही गोमंतकीय सांस्कृती नाही. पोर्तुगीजकालिन वसाहत संस्कृतीचा नाश करण्याच्या प्रयत्नात, थायलंडच्या अरिष्ट आणि घाणेरड्या संस्कृतीचा स्वीकारू करु नये", सावियो रॉड्रिग्ज यांनी एक्सवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गोवाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भ्रष्टाचाराच्या या सडलेल्या व्यवस्थेचा थेट मुकाबला केला पाहिजे. २५ निष्पाप गोवेकरांचा मृत्यू हा अपघात नाही - हे उघडपणे चालणाऱ्या एका बेकायदेशीर नाईटक्लबला परवानगी देणाऱ्या निर्लज्ज भ्रष्टाचाराचा थेट परिणाम आहे, असे सावियो रॉड्रिग्ज म्हणाले होते.

बेकायदेशीरपणी देण्यात आलेल्या परवानग्यांची साखळी पंचायत स्तरापासून सुरू झाल्याचे दिसून येते. येथूनच नियमांना बगल देण्यास सुरुवात झाली. याचा तपास घेतल्याचे याचे कनेक्शन थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल, असेही रॉड्रिग्ज म्हणाले होते.

याप्रकरणात निर्भीडपणे कोणतीही तडजोड न करता तपास करण्याची गरज आहे. या तपासातून प्रकरणाती सर्व बाबी उघड होतील आणि राज्यातील सर्वसामान्य नागिकांचा सरकार आणि प्रशासनावरील विश्वासही टीकून राहील, असे रॉड्रिग्ज म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

Gold Market Value: "युद्धामुळं सोनं झालं पॉवरफुल''! 35 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं बाजारमूल्य; भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही सोडलं मागं

Oldest Photograph Of Goa: गोव्यातलं सर्वात जुनं छायाचित्र कोणतं? सोशल मीडियावर रंगली चर्चा; 1855 सालच्या फोटोनं वेधलं लक्ष

VIDEO: "मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आणि भारताची धाकधूक'' जयशंकर यांनी व्यक्त केली मोठी चिंता; भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

SCROLL FOR NEXT