Pension Dainik Gomantak
गोवा

BJP Government: विधवांच्या पेन्शनबाबतच्या सरकारच्या निर्णयावर महिलांमध्ये असंतोष

BJP Government: शेतकर्‍यांनाही भुर्दंड, व्‍हेन्‍झीचा आराेप

Ganeshprasad Gogate

BJP Government: दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली विधवांना सरकारकडून दरमहा 2500 रुपये पेन्‍शन दिले जात होते. मात्र या महिलांना अधिक निधी पोचला असे कारण दाखवून आता त्‍यांच्‍या पेन्‍शनमध्‍ये कपात करण्‍याचा निर्णय समाज कल्‍याण खात्‍याने घेतल्‍याने कित्‍येक महिलांना आता दरमहा फक्‍त 1000 रुपये पेन्‍शन मिळत असून ही तुटपूंजी रक्‍कम घेऊन आम्‍ही करायचे काय? असा सवाल या महिला करत आहेत.

यावर बोलताना आमदार व्‍हिएगस म्‍हणाले, हे फक्‍त एकच उदाहरण नव्‍हे तर कित्‍येक महिलांची पेन्‍शन अशी कापण्‍यात आली आहे. सध्‍या भाजपचे मंत्री पंचायतीत येऊन लोकांच्‍या तक्रारी ऐकण्‍याच्‍ाा बहाणा करतात.

वास्‍तविक त्‍यांनी पंचायतीत आल्‍यावर हे पैसे का कमी झाले त्‍यावर स्‍पष्‍टीकरण देण्‍याची गरज आहे. ते पुढे म्‍हणाले, फक्‍त दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्‍याच लाभार्‍थ्‍यांच्‍या पेन्‍शनमध्‍ये कपात होत नसून यापूर्वी प्रधानमंत्री किसान योजनेखाली ज्‍यांना पैसे मिळाले होते त्‍यांना आता ते या योजनेत बसत नाहीत.

त्‍यामुळे मिळालेले पैसे व्‍याजासह परत करा अशा आशयाची पत्रे येऊ लागली आहेत. काही शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंत या योजनेखाली अनुदान मिळाले होते. आता त्‍यांच्‍यावर आता हे तीन लाख रुपये व्‍याजासह फेडण्‍याची पाळी अाली आहे.

जर हे लाभार्थी या योजनेत बसत नव्‍हते तर त्‍यांना ही मदत मिळालीच कशी असा सवाल करुन जर सरकारी अधिकार्‍यानंी काही गफलत केली असेल तर त्‍याचा भुर्दंड या लाभार्‍थ्‍यांनी का भरावा असा सवाल त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT