MLA Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa News : ‘आयपीबी’च्या आकडेवारीत तफावत : व्हेन्झी व्हिएगस

Goa News : आमदार व्हिएगस यांनी आपण किती प्रस्तावित प्रकल्प असल्याचे उत्तर सरकारकडे मागितले होते, त्याला आपीबीकडून १८ पानांचे उत्तर दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पणजी, गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळातर्फे (आयपीबी) २ लाख ४० हजार ९७७ चौ. मी. जमीन प्रकल्पासाठी वाटप केल्याचे लेखी उत्तर दिले आहे.

तर सहा महिन्यांपूर्वी आपणास १२ लाख ९१ हजार चौ. मी. जागा मंजूर दाखविली होती. या उद्योगांतून प्रस्तावित गुंतवणूक ६ हजार ५७० कोटी आणि प्रत्यक्षात ही ९५१.१ कोटी, म्हणजे दाखविला हिमालय, निघाला मोती डोंगर असाच प्रकार असल्याचे विरोधी आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सांगत सभागृहाचे लक्ष वेधले.

आमदार व्हिएगस यांनी आपण किती प्रस्तावित प्रकल्प असल्याचे उत्तर सरकारकडे मागितले होते, त्याला आपीबीकडून १८ पानांचे उत्तर दिले आहे. प्रस्तावित प्रकल्प आणि त्यांना दिलेल्या एकूण क्षेत्राची बेरीज केल्यावर वरील तफावत आढळून आली आहे. सहा महिन्यापूर्वी १२ लाख चौ. मी. दाखवता आता २ लाख चौ. मी. कशी दाखविली जाते, हेच आपण मंत्र्याकडे विचारतो. खात्याने चुकीची माहिती दिली आहे का, त्याची चौकशी होणार आहे का?

माविन म्हणाले, व्हेन्झी यांनी केलेली बेरीज बरोबर आहे म्हणून कोण सांगतो. आकडेवारी चुकली असेल तर त्याला उत्तरान्वये देऊ, असे ते म्हणाले.

माविन यांचा पलटवार

आयडीसी सर्वांना जमीन देते, आपण औद्योगिक विकास मंत्री असताना आम्हाला ४५० कोटींचा तोटा झाला. परंतु आता आम्ही फायद्यात आहोत. पहिल्यांदाच आम्ही जमिनीचा लिलाव करीत आहोत.

२०२१ मध्ये आम्ही पहिल्या लिलाव प्रक्रियेतून १३ कोटी आले होते, २०२१ मध्ये दुसऱ्या फेरीत ११ कोटी आले आणि २०२२ मध्ये २५ कोटी आले, चौथ्या लिलावात ७० कोटी आणि आता पाचव्या लिलावात १६ प्लॉटमधून १४० कोटी आले. यापूर्वी पैसेच नव्हते, म्हणून औद्योगिक वसाहतीत रस्ते करता आले नाहीत.

परंतु आता दोन औद्योगिक वसाहतीत रस्ते होणार आहेत. पैसेच नव्हते तेव्हा कसे काम करायचे, आता आम्ही काम करतो म्हणून दिसते काम करतात म्हणून असा टोला व्हेन्झी यांना माविन यांनी लगावला.

आपलेही व्हिडिओ व्हायरल झालेत!

माविन म्हणाले की, १२ लाख चौ. मी. जी जागा दाखविली आहे, ती आयपीबी आणि आयडीसी (औद्योगिक विकास महामंडळ) संयुक्त विद्यमानाने दिली गेली आहे. दोन लाख ४० हजार चौ. मी. जी नमूद केली आहे, ती मागील दोन वर्षांत आयपीबीने प्रकल्पासाठी दिली आहे.

परंतु व्हेन्झी यांच्या न्यायालयीन चौकशीच्या मागणीवर माविन म्हणाले, हा काय बालीशपणा आहे, हे काही आपणास समजत नाही. परंतु आम आदमी म्हणून माविन यांनी उल्लेख करताच व्हेन्झी यांनी आक्षेप नोंदविला.

त्याशिवाय माविन यांनी दिल्लीचा आप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, दिवसाला २५ लाख खर्च करतात असा उल्लेख माविन यांनी केला, त्याला व्हेन्झी यांनी आक्षेप नोंदविला. तुमच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल आहेत, त्याशिवाय हवे तसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही पद्धत चुकीची आहे. येथे आमदार कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नाही. येथे लोकांचे प्रतिनिधी आहेत, असे विरोधी आमदारांनी सभापतींना लक्षात आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT