Dhangar Samajbandhav from Bomigal-Desaiwada expressing grief over the unpaved road, Ugem (Goa) on Tuesday, 20 July, 2021. Manoday Fadte / Dainik Gomantak
गोवा

Goa : पक्क्या रस्त्यासाठी धडपडतोय धनगर समाजबांधव

Goa : बोमीगाळ-देसाईवाड्याकडे (Bomogal-Dessaiwada) लोकप्रतिनिधींचे (Representive Member) दुर्लक्ष

Sandeep Survekamble, Manoday Fadte

सांगे : Sanguem गोवा मुक्तिनंतर (Goa Librition) राज्याचे नेतृत्व अनेक मुख्यमंत्री, (Chief Minister) लोकप्रतिनिधी यांनी केले. परंतु ६० वर्षानंतरही उगे (Ugem) पंचायत क्षेत्रातील बोमीगाळ-देसाईवाडा (Bomigal Dessaiwado) याकडे विकासाच्या (Devlopment) बाबतीत लक्ष न दिल्याने या वाड्यावरील धनगर समाजबांधव आजही चार मीटर लांबीच्या पक्क्या रस्त्यासाठी (Paved Road) धडपडत आहे. कच्चा रस्ता (पायवाट) या ठिकाणी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत एखादी रुग्णवाहिकाही (Ambulance) या ठिकाणी येऊ शकत नाही. निवडणुकीपुरते (Election) लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनाची पाने तोंडाला पुसल्याचा आरोप येथील धनगर कुटुंबांनी केला आहे. (Goa)

गोवा मुक्तीची साठ वर्षे झाली. (Goa Libration Year) पण, बोमीगाळ-देसाईवाडा येथी धनगर समाज अजूनही रस्त्यापासून वंचित आहे. पन्नास वर्षांपासून (Fifty Year) या ठिकाणी धनगर समाजाची बारा कुटुंबे (Twelve Familly) वास्तव्य करून आहेत, तरीही एकाही लोकप्रतिनिधींनी आमच्या क्षेत्रात विकास (Development) करण्याकडे लक्ष दिले नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिक भागो काळे यांनी व्यक्त केली.

‘कोरोना’ काळात रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका गावात बोलविल्यास कच्च्या रस्त्यामुळे स्पष्टपणे नकार देण्यात आला. रस्त्याची परिस्थिती बिकट असल्याने डांबर घालण्यासाठी मांडलेल्या दगडातून चालत जाणेही जीवावर बेतू शकते. त्यामुळे रुग्णवाहिकाही या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. गरोदरपणात महिलांना खासगी वाहनातून घेऊन जाताना धोक्याचे बनत असल्याचे देऊ कस्तुरे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT