Director General of Police Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

'अपघात टाळण्यासाठी चालकांनी खराब रस्त्यांना दोष न देता वाहतूक नियमांचे पालन करावे'

पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, अपघातांच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी खराब रस्त्यांना दोष न देता वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

Goa : मागील काही दिवसांपासून गोव्यात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. दरदिवशी अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकताच झुआरी पुलावर झालेल्या घटनेमुळे राज्यभर शोक व्यक्त केला जात आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये गोवा पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोव्यात होणारे जास्तीतजास्त अपघात राज्यभरातील खराब रस्त्यांमुळे होतात अशा तक्रारी करत नागरिक सरकारला वेठीस धरत आहे. यावर राजकारण्यांनी आणि पोलिसांनी सरकारला जबाबदार न ठरवता जबाबदारीने वाहन चालवण्याकडे चालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, अपघातांच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी खराब रस्त्यांना दोष न देता वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. रस्ते चांगले नसल्यामुळे, लोकांनी त्यांची स्थिती समजून घेतली पाहिजे आणि रस्त्यांचा दर्जा हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासाठी निमित्त असू शकत नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जाणून घेऊन चालकांनी आपला वेग आणि वाहतुकीचे नियम याकडे लक्ष दिले पाहिजे.

दरम्यान, कासिमभाट-वझरी येथील चेतन सुभाष परब (19) या युवकाला दाडाचीवाडी-धारगळ येथे ट्रकने चिरडले. यात त्याच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला. शिवाय त्याच्या शरीराचे अवयव विखुरले होते. त्यामुळे घटनास्थळी मन सुन्न करणारे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक रोखून धरला आणि थोड्या प्रमाणात त्याची मोडतोडही केली. मात्र, पोलिस वेळीच घटनास्थळी पोचल्याने वातावरण निवळले. ही घटना 30 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT