Goa DGP वादाच्या भोवऱ्यात! आसगावातील घर पाडण्यासाठी त्यांनीच दबाव आणल्याचा हणजूण पोलिसांचा अहवाल
Assagao house Demolition | Goa DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa DGP वादाच्या भोवऱ्यात! आसगावातील घर पाडण्यासाठी त्यांनीच दबाव आणल्याचा हणजूण पोलिसांचा अहवाल

Pramod Yadav

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडलच्या घटनेत दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणात सुरुवातीपासूनच गोवा पोलिस महासंचालकांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. विरोधकांनी देखील महासंचालकांच्या चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान, आता महासंचालकांनीच आसगाव येथील घर पाडण्यासाठी दबाब आणला असा खळबळजनक खुलासा हणजूण पोलिसांनी सचिवांना सादर केलेल्या अहवालात केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे आहे. या वृत्तानुसार, पूजा शर्माला मदत म्हणून आसगाव येथील घर खाली करण्यासाठी गोवा पोलिसांवर पोलिस महासंचालकांनी दबाव आणला, असे सचिवांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर मुंबईची रहीवाशी असणारी महिला पूजा शर्मा विरोधात कोणतीही कारवाई करु नये असेही अहवालात नमूद केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

आसगाव येथील घर खाली करु न दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील महासंचालकांनी दिल्याचे हणजूण पोलिसांनी या अहवात म्हटले आहे.

हणजूण पोलिसांनी घराची मोडतोड थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिस महासंचालक त्यांच्यावर ओरडले आणि कोणत्याही परिस्थितीत घर खाली झालेच पाहिजे अशी तंबी दिली.

तसेच, कोणी याला विरोध करत असल्यास त्याला पोलिस स्थानकात घेऊन या, अशीही सूचना केली, असे वृत्त सचिवांना सादर केलेल्या अहवालाच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT