Goa News: धबधबा-डिचोलीत बिबट्याचा वावर, मेरशीत गॅस गळती, आसगाव प्रकरणासह गोव्यात ठळक बातम्या

Goa Today's 27 June 2024 Live News: गोव्यातील क्रीडा, पर्यटन, राजकारण, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील बातम्या.
पूजा शर्माने घर पुन्हा बांधून देण्याचे आश्वसन दिले - आगरवाडेकर
Goa Asgaon House DemolitionDainik Gomantak

धबधबा-डिचोली येथे बिबट्याचा मुक्त संचार

धबधबा-डिचोली येथे बिबट्याचा मुक्त संचार असून, नागरिकांनी सूर्यास्तानंतर खबरदारी बाळगण्याचे निर्देश वनविभागाने डिचोली नगरपालिकेला दिले आहेत.

पूजा शर्माने घर पुन्हा बांधून देण्याचे आश्वसन दिले - आगरवाडेकर

आसगाव घर प्रकरण: पूजा शर्मा यांच्या प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला घर पुन्हा बांधून देण्याचे आश्वसन दिले. आम्ही त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला असून, तक्रार परत घेणार नाही : प्रिंशा आगरवाडेकर

Merces Goa Leak: मेरशीत गॅस गळती, सहाजण गोमेकॉत दाखल

मेरशीतील स्क्रॅप यार्डमध्ये गॅस गळती. सहाजण बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल. गॅसचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, स्थानिकांकडून सक्त कारवाईची मागणी.

डिचोलीच्या नवीन चौपदरी बगलमार्गावरील धोकादायक दरड,  कोसळली दोषींवर गुन्हा दाखल करा

डिचोलीच्या नवीन चौपदरी बगलमार्गावरील धोकादायक दरड अखेर कोसळली. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करा. बगलमार्गाच्या कामाचे तांत्रिक ऑडिट करा. अशी डिचोली गट काँग्रेसने मागणी केलीय. आणखी दरड कोसळण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटलंय.

Canca, Mapusa: जुनाट वीज खांब बदलताना खाली पडून झारखंडच्या मजुराचा मृत्यू

काणका, म्हापसा येथील साईबाबा मंदिराजवळील रस्त्यावर जुनाट वीज खांब बदलण्याच्या कामावेळी खांबावर चढलेल्या झारखंडमधील भालेश्वर कुमार राठोड (३२) या मजुराचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू. म्हापसा पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

Asgaon Goa: आसगाव प्रकरणात हे अपेक्षितच होतं - विजय सरदेसाई

आसगावच्या प्रकरणात हे अपेक्षित होतं असं विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. उत्तर गोव्यात पुड्यांचं कल्चर आहे. यामुळे परप्रांतीयांना अजून प्रोत्साहन मिळेल सरकारने यात लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केलीय.

Goa Forward: स्मार्ट सिटी, कला अकादमी! गैरप्रशासनाबाबत गोवा फॉरवर्डचे राज्यपालांना निवेदन

विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पीएस पिल्लई यांना स्मार्ट सिटी, कला अकादमी आणि राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यासारख्या गैरप्रशासनाच्या मुद्द्यांवर राजभवन येथे निवेदन सादर केले.

E-Bikes For Pilots: कमी हफ्ता, मोफत चार्जिंग; मोटरसायकल पायलट्सना मिळणार ई-बाईक्स

राज्यातील मोटरसायकल पायलट्सना सरकार ई-बाईक्स देण्याचा विचार करत आहे. कमीतकमी हप्ता व मोफत चार्जिंग, असा लाभ मिळणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पायलटांसमोर मांडला प्रस्ताव.

Rain In Goa: दामण- राया येथील सहा घरे पाण्याखाली

दामण- राया येथील सहा घरांत घुसले पावसाचे पाणी. एका घरमालकाने जुने ड्रेनेज बंद केल्याने साचले पाणी. तात्काळ लक्ष न घातल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता.

Asgaon Goa: आसगाव प्रकरणात तडजोड धक्कादायक, सरकारने खटला लढावा - लोबो

"माझ्या मतदारसंघातील गोमंतकीयाचे घर पाडण्यात आले, त्या कुटुंबीयांनी या प्रकरणात तडजोड केल्याचे ऐकून मला धक्का बसला. गोवा हा अभिमानी लोकांचा समुदाय आहे. आमचा अशाप्रकारे अवमान केला जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारने हा खटला लढावा अशी मी मागणी करते. गोवा आणि गोमंतकीयांना हे प्रकरणे कळणे आवश्यक आहे. कोणी आपल्याला गृहित धरु नये, आमचा अभिमान विकू नये." - दिलायला लोबो.

Asgaon Goa: आसगावातील आगरवाडेकर तक्रार मागे घेण्यास तयार

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय तक्रार मागे घेण्यास तयार. दिल्लीतील बिल्डरच्या प्रतिनिधीने भेट घेऊन नुकसान भरपाई देण्याची हमी दिल्यानंतर आगरवाडेकरांचा निर्णय. मुख्यमंत्री किंवा सरकारकडून कोणत्याही मदतीची मागणी केली नसल्याची त्यांची माहिती.

Bicholim Bypass Road: अखेर 'ती' दरड कोसळलीच..!

डिचोलीच्या नवीन चौपदरी बगलमार्गावरील 'ती' धोकादायक दरड कोसळली. गुरुवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना. मोठी आपत्ती टळली. दोन दुचाकी सुखरूप सुटल्या.

Asgoan Goa: आसगाव घर मोडतोड प्रकरण! एक सूत्रधार अटकेत, वाहन जप्त

आसगाव येथील आरवाडेकर घर मोडतोडप्रकरणीचा तपास क्राईम ब्रँचकडे सुपूर्द. अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली 4 सदस्यीय SIT स्थापन. मुख्य सूत्रधाराला वाहन दिल्याप्रकरणी मंगूर वास्को येथील अशफाक कादीर शेख (40) याला अटक. वाहनही जप्त.

Theft In Ponda: फोंड्यात एका रात्रीत अज्ञातांनी फोडली 10-12 दुकाने

फोंडयातील कुडतरकर आर्केडमधील 10-12 दुकानें अज्ञात चोरट्यानी बुधवारी (दि. 26) रात्री फोडली. पोलीस घटनास्थळी दाखल. नेमका किती ऐवज लंपास केला याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com