Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : ‘डबल इंजिन’मुळे गोवा विकसित : मुख्यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News :

शिरोडा, विकसित गोवा, विकसित भारत अंतर्गत गोव्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रातील व राज्यातील डबल इंजिन सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली विकासाचा एक एक टप्पा यशस्वीरीत्या पार करीत आहे.

पन्नास वर्षांत झाला नव्हता एवढ्या झपाट्याने विकास गेल्या दहा वर्षांत झालेला असून राज्याचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गुरुवारी (२२ रोजी) शिरोड्याचे आमदार तथा सहकार व जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून काराय, शिरोडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा मैदानावर आयोजित केलेल्या महिला समृद्धी आणि कृषी मेळाव्यात डॉ. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री डॉ. प्रल्हाद जोशी, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री गोविंद गावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, ॲड. मनोहर आडपईकर, दामू नाईक, आमदार दिलायला लोबो, बाबू कवळेकर, नारायण कामत, शिरोडाच्या सरपंच पल्लवी शिरोडकर तसेच बोरी, बेतोडा निरंकाल पंचवाडीचे पंच सरपंच व्‍यासपीठावर होते.

डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, अंडरग्राऊंड केबल, इंटरनेट फॅसिलिटी, नॅशनल हायवे, पूल, शाळा, महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयांना अद्ययावत इमारती बांधल्या.

विविध तऱ्हेचे प्रकल्प या सरकारने पूर्ण करून सर्वसामान्य नागरिकांना अन्न, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या. अपंग, विधवा, दिव्यांगासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विविध योजना पुरविल्या. नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती आणि गरीब कल्याण योजनेमार्फत पाच वर्षे गरिबांना फुकट रेशन धान्य कोटा देण्याची योजना राबवली जात आहे.

अनेक युवक लोकांना स्वतःचे उद्योग व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून विकसित भारताचे स्वप्न साकारत आहे. त्यासाठी पुढील काळातही मोदी सरकार केंद्रात सत्तेत हवे, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, चार पीलरद्वारा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न होणार आहेत. महिला सशक्तीकरण, शेतकरी सशक्तीकरण, गरिबांचे जीवन सुखकर जाण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. असे ते म्हणाले.

सदानंद शेट तानावडे म्हणाले की, मोदी सरकार युवकांना केंद्रबिंदू मानून देशाचा विकास साधला जात आहे. देशात २४ कोटी लोक गरिबीचे जीवन जगतात ते आता फक्त १० टक्क्यावर आले आहे. ही संख्या कमी होऊन देश विकसित राष्ट्र होणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. सुभाष शिरोडकर व माया शिरोडकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे व मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार घालून वाढदिनाचे अभीष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी केक कापून व वाढदिनाचे गीत गाऊन शिरोडकर यांचा वाढदिन साजरा करण्यात आला. सरपंच पल्लवी शिरोडकर यांनी स्वागत केले. प्रा. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य नारायण कामत यांनी आभार मानले. या मेळाव्यास हजारो लोक उपस्थित होते.

शिरोडा स्वच्छ, हरित ठेवणार : शिरोडकर

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, राज्यातील ४० ही मतदारसंघात शिरोडा मतदारसंघ हा स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्याचा आम्ही संकल्प सोडलेला आहे.

भाजप सरकारच्या कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्‍वाने देशाबरोबरच गोव्याचा चौफेर विकास आहे. शिरोडा मतदारसंघातील जनता भाजपला पुढेही पाठिंबा देत राहणार आहे.

भ्रष्टाचारमुक्त सरकार : जोशी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, भाजपचे सरकार हे भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे, म्हणूनच भाजप सरकारच्या कारकिर्दीत देशविकास आणि प्रगतीच्या दृष्टीने जगात पाचव्या क्रमांकावर तो पुढे तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे.

महिलांना निवडणुकीत सर्वच क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण देण्याचे मोदी शासनाने ठरविल्याचे जोशी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT