संस्कारक्षम आणि "स्मार्ट" शिक्षण देण्याचा संकल्प दीनदयाळ विद्यामंदिरप्राथमिक शाळेने घेतला आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: दीनदयाळ विद्यामंदिराची उद्यापासून "स्मार्ट" शिक्षण संकल्पनेला प्रारंभ

यंदाही महामारीच्या संकटामुळे ऑनलाईन वर्ग घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: संस्कारक्षम आणि "स्मार्ट" शिक्षण (Smart education) देण्याचा संकल्प (Resolution) केलेल्या डिचोलीतील 'दीनदयाळ विद्यामंदिर' (Deendayal Vidyamandir) या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत उद्यापासून (From tomorrow) (सोमवारी) ऑनलाईन शिकवणीला प्रारंभ होत आहे. अशी माहिती अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विद्यामंदिराचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल वेर्णेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेल्या दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे हे विद्यामंदिर चालविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेवेळी दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लभ साळकर, उपाध्यक्ष कांता पाटणेकर, शाळेच्या व्यवस्थापिका सिद्धी प्रभू कोटकर, श्रुती घाटवळ, तज्ज्ञ शिक्षक सर्वेश कोटकर आणि डॉ. संदीप सावंत उपस्थित होते.

व्हाळशी-डिचोलीत विद्यामंदिर

पटसंख्येअभावी बंद पडलेली व्हाळशी येथील सरकारी शाळा इमारत सरकारने विद्यामंदिरासाठी दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानच्या ताब्यात दिली आहे. मागील जानेवारी महिन्यात इमारत ताब्यात दिल्यानंतर या इमारतीची आवश्यक रचनेनुसार दुरुस्ती करण्यात आली आहे. 'नेस्ले' कंपनीने या शाळेसाठी स्वच्छतागृह बांधून देण्याची तयारी दर्शविली आहे. मागील शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण खात्याने दीनदयाळ विद्यामंदिराला वर्ग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. मात्र 'कोविड' संकटामुळे मागीलवर्षी इयत्ता पहिलीचा वर्ग प्रत्यक्ष सुरु करणे शक्य झाले नाही. यंदाही महामारीच्या संकटामुळे ऑनलाईन वर्ग घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. अशी माहिती प्रा. विठ्ठल वेर्णेकर, वल्लभ साळकर आणि सिद्धी प्रभू कोटकर यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञान अर्थातच 'स्मार्ट' बोर्डच्या मदतीने ऑनलाईन शिकवणी करण्यात येणार आहे. दोन तज्ज्ञ शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 'एसीजीएल' कंपनीने सीआरएस उपक्रमांतर्गत शाळेसाठी दोन स्मार्ट बोर्ड आदी मिळून 5 लाख रुपयांचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. यापुढेही अनेकांनी शाळेसाठी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रा. वेर्णेकर यांनी दिली. ही शाळा एक 'मॉडेल' शाळा बनविण्याचा संस्थेने संकल्प केला असल्याची माहिती कांता पाटणेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT