Sambhaji Bhide Dainik Gomantak
गोवा

Sambhaji Bhide In Goa: संभाजी भिडेंचे महात्‍मा गांधी, तिरंगा विषयावर प्रक्षोभक वक्तव्य, हिंदूंना चिथावणी

राष्‍ट्रीय ध्‍वज भगवा व्‍हावा; राष्‍ट्रव्‍यापी आंदोलनाचा घाट

गोमन्तक डिजिटल टीम

Sambhaji Bhide In Goa ज्‍या मुसलमानांनी हिंदुस्‍थानावर आणि हिंदूंवर अत्‍याचार केले, त्‍यांचे प्रतीक असलेला हिरवा रंग राष्‍ट्रीय झेंड्यावर असणे ही देशासाठी शरमेची बाब आहे, असे तिखट वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केले. भगवा झेंडा हाच राष्‍ट्रीय ध्वज असणे आवश्‍‍यक आहे.

यासाठी संपूर्ण देशात आंदोलन होण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या आंदोलनाची महाराष्‍ट्रातून सुरुवात करू. गोव्‍यातूनही यासाठी प्रयत्‍न व्‍हावा यासाठी युवकांनी एकत्र यावे, अशा आवाहनाद्वारे भिडे यांनी समस्त हिंदूंना चिथावणी दिली.

अखिल गोमंतकीय हिंदू धर्म सभेतर्फे दवर्लीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांनी व्याख्यान देताना हिंदू समाजाने अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले. हिंदुस्थानात राज्य करण्यासाठी इंग्रजांनी येथील समाजाची वृत्ती पाहिली होती.

या देशातील व्यक्ती आत्मकेंद्रीत आहे. ‘ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी’ असा इथला समाज आहे, असे इंग्रजांनी पत्रातून इंग्लंडला कळवले होते. देश, धर्म, समाज, राष्ट्र याकडे लक्ष देणारा हा समाज नाही, असे त्याकाळी कळवले होते. आताही यात फरक पडलेला नाही, असे भिडे म्हणाले.

संभाजी भिडे काय म्हणाले?

  • मुस्लीमांच्‍या अत्‍याचाराचे प्रतीक असलेला हिरवा रंग राष्‍ट्रीय झेंड्यावर नकाेच

  • महात्‍मा गांधी हे जन्‍माने मुस्‍लीम होते. त्यामुळेच त्‍यांना मुस्‍लीमांचा पुळका होता.

  • भारताचा राष्‍ट्रीय झेंडा भगव्‍या रंगाचा असावा, अशी शिफारस झेंड्याचा रंग ठरविण्‍यासाठी नेमलेल्‍या समितीने केला होता.

  • मात्र, मुस्‍लीमांचा पुळका असल्‍यामुळे गांधी यांनी त्‍यात हिरवा आणि पांढरा रंग घुसडला.

  • देशाची स्‍वातंत्र्यलक्ष्‍मी भगवा झेंडा घेऊन लढत तुरुंगात गेली; पण तुरुंगातून बाहेर पडताना तिच्‍या खांद्यावर तिरंगा होता.

शिवपुतळ्‍याची मोडतोड हिंदू सहन करतात तरी कशी?

हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली आणि हिंदूंवर अत्याचार झाले. जगातील ३९ मुस्लिम देशांनी हिंदुस्थानावर आक्रमणे केली. ख्रिश्चन व्यक्ती छत्रपती शिवराय‍ांची मूर्ती तोडतात आणि हिंदू समाज उघड्या डोळ्यांनी हे पाहातो, इतका हिंदू समाज सहनशील आहे.

या नेभळटपणामुळेच हिंदू आजपर्यंत मागे राहिले, असे भिडे म्‍हणाले. गोव्‍यात शिवाजी महाराजांच्‍या पुतळा मोडतोडीच्या पार्श्‍वभूमीवर भिडे यांनी व्‍याख्‍यानाला सुरुवात केली. ही वृत्ती हिंदूंनी सोडून न दिल्‍यास देशाचा विनाश अटळ आहे, असेही ते म्‍हणाले.

नेभळट हिंदूच राष्‍ट्राचे वैरी :

देशातील हिंदू एकसंघ नाहीत, हीच देशाची मोठी शोकांतिका आहे. हिंदू स्‍वार्थी असल्‍यामुळे ताे कुठल्‍याही स्‍तराला जायला तयार होतो, असे सांगून राजा मानसिंग यांचे उदाहरण त्‍यांनी दिले.

दिल्‍लीच्‍या तख्‍ताचा फायदा आपल्‍याला व्हावा, यासाठी मानसिंगने आपल्‍या बहिणीचा निकाह अकबराशी केला. आजही या वृत्तीत बदल झालेला नाही. हिंदूंमधील नेभळटपणा जाऊन कडवेपणा येत नाही, तोपर्यंत देश पुढे जाणार नाही, असे भिडे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

SCROLL FOR NEXT