Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: 'महागाई भत्ता,सातवा वेतन’द्या! गोवा डेअरी कर्मचाऱ्यांची मागणी, कामगारांचा फोंड्यात मोर्चा

Goa Dairy Protest: महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग लागू करा, आदींसह विविध मागण्यांसाठी गोवा डेअरीच्या गोवा दूध कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी फोंड्यात मोर्चा काढण्यात आला.

Sameer Panditrao

फोंडा: महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग लागू करा, आदींसह विविध मागण्यांसाठी गोवा डेअरीच्या गोवा दूध कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी फोंड्यात मोर्चा काढण्यात आला. गोमंतक मजदूर संघ आणि ‘आयटक’च्या नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दूध उत्पादक संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

गोमंतक मजदूर संघाचे अध्यक्ष पुती गावकर, आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व गोवा डेअरी दूध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू गावकर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मागच्या बराच काळ प्रलंबित असलेल्या दूध कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गोवा डेअरी दूध प्रशासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली.

त्यात महागाई भत्ता, रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच गोवा डेअरीतील गैरव्यवस्थापन सुधारणे यासह इतर अनेक मागण्यात करण्यात आल्या.

कामगार नेते पुती गावकर व ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना आता उग्र आंदोलनाची गरज असून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी तयार रहावे, अशी सूचना केली.

आठवा वेतन आयोग देशात लागू होण्याची शक्यता आहे, मात्र, कामगारांना अद्याप सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींपासूनही वंचित ठेवले गेले आहे, असे फोन्सेका म्हणाले. कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठिशी राहू, अशी ग्वाहीही कामगार नेते फोन्सेका यांनी दिली. यावेळी कामगार मोठ्या संख्येने हजर होते.

कामगारांची बैठक घेऊन पुढील निर्णय

गोवा डेअरी कामगारांची पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आता टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली असली तरी सर्व कामगारांना विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, त्यासाठी डेअरी प्रशासन, सरकारी यंत्रणेशी संपर्क साधून गोवा डेअरीच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंबंधी सांगोपांग चर्चा करण्यात येईल, आणि नंतरच मग पुढील निर्णय घेण्यात येईल, हा मोर्चा म्हणजे गोवा डेअरी प्रशासन आणि सरकारी यंत्रणेला एकप्रकारचा इशारा असल्याचेही कामगार नेत्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT