Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: 'त्या' दोघांच्या कारनाम्यामळे गोवा- बंगळूर विमानात खळबळ, घडलेला प्रकारही संतापजनक; वाचा नेमकं काय झालं...

Dabolim Airport सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर मात्र कालांतराने समोर आले काही भलतेच

Ganeshprasad Gogate

Dabolim Airport मंगळवारी रात्री दाबोळी विमानतळावर एका जोडप्याने गोव्याहून बंगळुरला जाणाऱ्या इंडिगो विमानात बाँम्ब असल्याचे वृत्त पसरवल्याने एकच खळबळ उडाली.

मात्र विमानाची आणि संबंधित व्यक्तींची कसून तपासणी केल्यावर ती निव्वळ अफवा असल्याचे समोर आले. मात्र बाँम्ब असल्याचे वृत्त समजताच सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. या संपूर्ण घटनेमुळे विमानाला काही तास उशीरही झाला. security systems

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील माणूस आणि कोलकाता येथील मुलगी गोव्यात पर्यटनासाठी गोव्यात आले होते. गोव्यातून निघतेवेळी त्यांनी दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोवा-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याची बातमी पसरवली.

या प्रकरणातील महिलेने तिच्या सोबत असलेल्या माणसाच्या बॅगेत बॉम्ब असल्याची बातमी विमानतळ प्राधिकरणाला कळवल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. त्यानंतर सर्व विमानाची तपासणी करण्यात आली.

मात्र तपासणी केल्यावर ती निव्वळ अफवा असल्याचे समजले. या प्रकरणी त्या दोघांना विमानतळ प्राधिकरणाने विमानातून बाहेर काढत पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान विमानतळ प्राधिकरणाने कडक सुरक्षा प्रोटोकॉल आखत खोट्या बॉम्बच्या अफवेमागील हेतूंबद्दल चोकशी सुरु केली असून तपासात अन्य बाबी उघडकीस येण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले!

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT