Cyber Crime Helpline Number Goa
पणजी: ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला आलेल्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. संशय आल्यास त्वरित पोलिसांच्या हेल्पलाईन केंद्राशी संपर्क साधा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी आणि वाहतूक अनुपालन सुधारण्यासाठी गोवा पोलिसांनी आज समर्पित सायबर हेल्पलाईन सेंटर (१९३०), सायबर-योद्धा कार्यक्रम, एआय-एमएल लॅब आणि क्विक पास मोबाईल ॲप्लिकेशन या चार अग्रगण्य उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१८) उद्घाटन करण्यात आले.
रायबंदर-पणजी येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर पोलिस महासंचालक अलोक कुमार, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई, उपमहानिरीक्षक (मुख्यालय) अजय शर्मा, अधीक्षक (क्राईम ब्रँच) राहुल गुप्ता, अधीक्षक (वाहतूक) प्रबोध शिरवईकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील सुमारे १२० सायबर-योद्धा उपस्थित होते. यावेळी या सायबर योद्ध्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
‘क्विक पास मोबाईल ॲप’ या उपक्रमामुळे वाहतूक अनुपालन वाढविण्यासाठी आणि वाहनचालकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. वाहतूक पोलिसांनी एकदा तपासणी होऊन क्यूआर कोड चालकाला दिल्यावर वारंवार पोलिसांना कागदपत्रे पडताळणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. हा क्यूआर कोड १२ तासांऐवजी २४ तास केला जाईल.
कायद्याच्या अंमलबजावणीत एआय आणि एमएलची वाढती भूमिका ओळखून, गोवा पोलिसांनी समृद्ध भारत टेक्नॉलॉजीस प्रा. लिमिटेड, गोवा-आधारित एआय सोल्युशन्स स्टार्टअपच्या सहकार्याने एआय-एमएल लॅबची स्थापना केली आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील १९३० सायबर क्राईम हेल्पलाईन केंद्र रायबंदर येथील क्राईम ब्रँचमध्ये स्थलांतर करण्यात आले, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले.
२०२३ साली सायबर कक्षाकडे १७८८ तक्रारी आल्या होत्या तर २०२४ मध्ये २८४० तक्रारी आल्या. पोलिस वाहतूक विभागात ‘ट्रॅक’ हा ॲप सुरू झाल्यापासून वाहतुकीच्या कोंडीची माहिती कळून तेथे तत्परतेने कार्यवाही होऊ लागली आहे. लोकांना सेवा देणारा आणखी एक ॲप लवकरच येत्या सहा महिन्यांत उपलब्ध होईल.आलोक कुमार, पोलिस महासंचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.