Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: मैत्रिणीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या मडगावांतील श्रीपाद नाईकला अटक

Goa Crime News: 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

Ganeshprasad Gogate

Goa Crime News: स्नॅपचॅट ॲप वापरून मैत्रिणीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर शेअर करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात 31 जानेवारीला सायबर क्राइम पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान ज्या ID वरून फोटो शेअर झाले होते त्या ID चा शोध घेत पोलिसांनी श्रीपाद नाईक नामक युवकाला ताब्यात घेतलंय.

अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिला तिचे अश्लील फोटो शेअर करायला लावून ते व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी मडगावातील श्रीपाद नाईक याला अटक केली आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार राजधानी पणजी शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार दिली होती. श्रीपाद नाईक नामक युवकांसोबत तिची मैत्री होती.

त्याच दरम्यान श्रीपाद नाईक नामक युवकाने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते. तसेच तिने लैंगिक कृत्यास संमती न दिल्यास सोशल मीडियावर ते प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सदर ID चा शोध घेत युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या सायबर गुन्ह्यांचे तपास अधिकारी सतीश पडवळकर, पीआय सायबर पोलीस गोवा यांच्या अंतर्गत तपास प्रक्रियेत आहे.

या घडणाऱ्या घटनांवरून सायबर पोलिसांच्या असे लक्षात आले आहे की शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या काही तरुण मुली रिलेशनशिपमध्ये असताना त्यांच्या पार्टनर सोबत त्यांचे अशील फोटो- व्हिडिओ शेअर करतात.

मात्र ब्रेकअपनंतर तोच बॉयफ्रेंड त्या मुलीला धमकावण्यासाठी सर्व फोटोचा वापर करतात. यासंबंधी पोलिसांनी पालकांना विशेष आवाहन केले असून मुलांवर विशेषत: तरुण मुलींवर लक्ष ठेवावे, अशी ताकीद दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT