Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

2637 Cyber fraud cases Goa: राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, दररोज सरासरी १५ नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: ‘ई-चलन’ भरण्याच्या बहाण्याने माशेल येथील युवकाला दोन लाखांचा गंडा, ऑनलाइन पद्धतीने म्हैस खरेदी करण्याच्या प्रयत्नात मडगाव येथील युवकाची ६० हजारांची फसवणूक, तर ऑनलाइन बँक व्यवहाराच्या बहाण्याने मांद्रे येथे एका व्यक्तीची सव्वा चार लाखांची फसवणूक... अशा अनेक प्रकारांत गोमंतकीय सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, दररोज सरासरी १५ नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोव्यात डिजिटल क्रांतीसोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांतच राज्यातील तब्बल २,६३७ नागरिकांना सायबर भामट्यांनी आपली शिकार बनवले आहे. या फसवणुकीत गोव्यातील नागरिकांचे तब्बल ४१ कोटी रुपये लुटण्यात आले आहेत.

आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सायबर पोलिसांकडे तक्रारींचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सजग मानल्या जाणाऱ्या गोव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या फसवणुकीत ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत गोवा पोलिसांनी भामट्यांची बँक खाती गोठवून सुमारे ९.५० कोटी रुपये वाचविण्यात यश मिळविले आहे.

पोलिस प्रशासनाचे आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अज्ञात व्यक्ती बँक तपशील, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती मागत असल्यास ती देऊ नये. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, जेणेकरून फसवणुकीची रक्कम तातडीने गोठविणे शक्य होईल.

सायबर सुरक्षेसाठी सुवर्ण नियम

गुप्त माहिती कधीही शेअर करू नका. बँक अधिकारी कधीही फोनवर ओटीपी, एटीएम पिन किंवा नेट बँकिंगचा पासवर्ड विचारत नाहीत.

लॉटरी, बक्षीस किंवा वीज बिल कापण्याची भीती दाखवणाऱ्या कोणत्याही एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवरील संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

घरबसल्या अर्धवेळ काम करून किंवा यूट्यूब व्हिडिओ लाईक करून रोज हजारो रुपये कमावण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये AnyDesk किंवा TeamViewer यांसारखी स्क्रीन शेअरिंग ॲप्स कधीही इन्स्टॉल करू नका.

शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये कमी कालावधीत दुप्पट परताव्याचे ॲप्स आणि संकेतस्थळांपासून दूर राहा.

फसवणुकीचे प्रमुख प्रकार

१ सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत.

२ टास्क फ्रॉड : ‘घरबसल्या कमवा’ किंवा ‘यूट्यूब व्हिडिओ लाईक करा’ अशा आमिषांद्वारे फसवणूक.

३ बँक केवायसी अपडेट : बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असल्याची भीती दाखवून फसवणूक.

४  इन्स्टंट लोन ॲप्स : कमी व्याजदराचे आमिष दाखवून आर्थिक गंडा.

५ शेअर मार्केट व क्रिप्टो गुंतवणूक : अल्पावधीत दुप्पट परताव्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT