Goa Curfew What things will be allowed Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी झाल्यावरच समजणार काय सुरू काय बंद

गोवा (Goa) राज्य सरकारने शनिवारी संचारबंदीत (Curfew) पुन्हा आठवडाभराची वाढ केली. आता कोणत्या गोष्टींना (New Guidelines) मुभा दिली जाणार आहे, हे प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आदेश जारी झाल्यावरच समजणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना (Covid-19) व डेल्टा प्लस (Delta Plus) कोविड विषाणू राज्यात (Goa) पुन्हा कोविडची तिसरी लाट आणू शकतो, या शक्यतेने राज्य सरकारने शनिवारी संचारबंदीत पुन्हा आठवडाभराची वाढ केली. 5 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात निर्बंध कायम असतील. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. (Goa Curfew What things will be allowed)

पावसाळापूर्व कामे करण्यासाठी हार्डवेअरची दुकाने तसेच प्लास्टिकचे साहित्य विकणारी दुकानेही सरकारने खुली केली होती. आता पुन्हा मुदतवाढ देताना कोणत्या गोष्टींना मुभा दिली जाणार आहे, हे प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आदेश जारी झाल्यावरच समजणार आहे.

संचारबंदीच्या काळामध्ये सरकारने सरकारी कार्यालय सुरू ठेवण्यास, कंपन्यांचे कामकाज सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. गेल्या मुदतवाढीवेळी पंचायत व पालिकांचे बाजार खुले करण्यास सरकारने परवानगी दिली होती, तसेच 50 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्यासही मान्यता दिली होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी झाल्यावरच समजणार काय सुरू काय बंद.

आरटीपीसीआर चाचण्या भरवशाच्या!

कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्याच जास्त भरवशाच्या आहेत. सीमांवर सध्या ॲन्टिजेन कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. कारण ॲन्टिजेन चाचण्याचे अहवाल लगेच देता येतात. आरटीपीसीआर चाचण्या घेतल्यास त्यांचे अहवाल दोन ते तीन दिवसांनी मिळतात. त्यामुळे सीमांवर या चाचण्या शक्य नाहीत. लोकांना सीमेवर अडवून तीन दिवस ठेवता येत नाही. म्हणून ॲन्टिजेन चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.

सीमेवर ॲन्टिजेन चाचण्यांना वेग

  1. डेल्टा प्लस संकटाची दखल घेऊन राज्यातील सर्व नाक्यांवर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

  2. शुक्रवारी राज्यातील केरी-सत्तरी, पत्रादेवी, दोडामार्ग या तीन सीमा नाक्यांवर प्रयोगशळांचे कक्ष उभारून ॲन्टिजेन कोविड चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या.

  3. शनिवारी मोले व पोळे या कर्नाटकातून गोव्यात वाहने येणाऱ्या मार्गावरील सीमा नाक्यावरही ॲन्टिजेन चाचण्याला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या सर्वच मार्गावर आता ॲन्टिजेन चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

  4. ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही त्या सर्वांना सक्तीने ॲन्टिजेन कोरोना चाचणी करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी 270 रुपये शुल्क आकारले जात आहे.

  5. तपासल्यानंतर अहवाल 15 ते 20 मिनिटांत दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT