Goa : Rusty mineral transport truck in Curchorem Goa. Dainik Gomantak
गोवा

Goa : खाणबंदीनंतर कुडचडेची रया गेली

चाळीस उद्योगांपैकी सात ते आठ तग धरून, उर्वरितांना आजारपण ग्रासले (Goa)

Mahesh Tandel, Manoday Fadte

कुडचडे : कुडचडे मतदारसंघ (Curchorem Constituency) हा सांगे, केपे, सावर्डे या मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. एके काळी गजबजलेल्या गोव्यातील (Goa) इतर शहरांपैकी एक म्हणून कुडचडे शहराची ओळख होती. मतदारसंघात खनिज (Mine) उत्खनन क्षेत्र नाही, पण खनिज निर्यात (Mine Export) केंद्र असल्याने या भागाला विशेष महत्त्व आले होते आणि तीच ओळख बनली होती. जलमार्ग आणि लोहमार्गाद्वारे (रेल्वे) (Railway) खनिज निर्यात होत असल्यामुळे शहराला भरभराट आली होती. सांगे, केपे, सावर्डे या तीनही मतदारसंघातील खनिज निर्यात कुडचडेमधून होत असल्याने व्यापारउदीम (Trading) जोरात होत असे. आठवड्याच्या बाजाराला होणारी गर्दी अनेकांच्या आर्थिक उलाढालीला मदत करीत होती. पण, आज परिस्थिती फार बदलून गेली आहे.

मतदारसंघातील खामामळ आणि बागवाडा पुरुषम्हारू, कुडचडे या भागाचा विचार केल्यास साधारण सव्वा दोन हजार मतदारसंख्या आहे. नोकरी नसल्याने व्यवसाय म्हणून खनिज वाहतूक करण्यासाठी सुशिक्षित तरुण या व्यवसायात उतरले. दोन्ही प्रभागात मिळून सव्वाशे खनिजवाहू ट्रक आहेत. पण, खाणबंदीनंतर कित्येक ट्रक जागच्या जागी गंजून गेले आहेत. अन्य उद्योग व्यवसाय नसल्याने या भागात अवकळा पसरली आहे. परत हा व्यवसाय सुरू व्हावा, अशी मागणी या भागातील जनता करीत आहे.

औद्योगिक क्षेत्रालाही झळ
मतदारसंघात काकोडा औद्योगिक वसाहत आहे. सुमारे चाळीस उद्योग या ठिकाणी सुरू होते, पण आज जेमतेम सात ते आठ उद्योग तग धरून आहेत. इतर व्यवसाय कोविड महामारीपूर्वीच आजारी पडले आहेत. युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लोक प्रतिनिधी पुढाकार घेतला असता, या ठिकाणी उद्योगांना पूरक स्थिती निर्माण केली असती, तर आज अनेकांच्या हाताला काम मिळाले असते. वीज, पाणी, रस्ते, जलमार्ग, रेल्वेमार्ग आणि मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार असताना रोजगारक्षम उद्योग सुरू करण्यास लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीचा अधिकाधिक विस्तार होत असताना काकोडा कुडचडेतील उद्योग वसाहती आजारी पडत गेल्या. याचा परिणाम रोजगार शोधणाऱ्या तरुण वर्गावर झाला आहे.

...तर कृषीक्रांती झाली असती!
शहरापुरता खनिज व्यवसाय निगडित आहे. पण उर्वरित भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय. पाणी मुबलक प्रमाणात असूनही शेती व्यावसायिक मागे का हटले, याचा कधी विचार झालाच नाही. राजकारणीसुद्धा खनिज व्यवसायात गुरफटून राहिले. शेती, बागायतींकडे दुर्लक्ष झाले. शहरातील थोडा भाग वगळल्यास इतरत्र कृषी उत्पादन घेणे शक्य असताना त्यांना प्रोत्साहन देण्यात आले नाही. त्यांच्या अडचणी समजून घेऊन चालना दिली असती, तर कृषीक्रांती झाली असती.

विकासात्‍मक प्रस्‍ताव रखडले
या मतदारसंघात पर्यटन व्यवसाय करण्यासारखे ठिकाणच नाही. रामराव देसाई हे आमदार असताना ‘नंदा तलाव’ विकसित करून पर्यटनदृष्ट्या सभोवतालचा विकास करावा, जेणेकरून एक विरंगुळा म्हणून जलसफर (बोटिंग), उद्यान, आकर्षक दिवाबत्ती, रेस्टॉरंट अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पण, त्यानंतर काहीच प्रगती नाही. काकोडा आरोग्य केंद्र सज्ज झाले आहे. रुग्णांची सोय होऊ शकते. पण, तिथपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. एकेरी वाहतुकीमुळे फार त्रास होतात. शिवाजी सर्कल परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. हा प्रस्तावसुद्धा धूळ खात पडलेला आहे. सर्कल विस्तारीकरण प्रकल्पात बागबगीचे, चिल्ड्रन पार्क अशी योजना होती. काही अपवाद वगळता कुडचडे शहर विकसित होत आहे, पण इतर भागापासून ‘विकास’ दूर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT