आदर्श युवा संघातर्फे आयोजित 21 व्या लोकोत्सवाची माहिती देताना माजी मंत्री रमेश तवडकर बाजूला अशोक गावकर, श्रीकांत तवडकर.
आदर्श युवा संघातर्फे आयोजित 21 व्या लोकोत्सवाची माहिती देताना माजी मंत्री रमेश तवडकर बाजूला अशोक गावकर, श्रीकांत तवडकर. Dainik Gomantak
गोवा

Goa: लोकोत्सवात 20 राज्याच्या सांस्कृतिक कला प्रदर्शित

दैनिक गोमन्तक

काणकोण: आमोणे पैगीण येथील आदर्श ग्रामात 10 ते 13 डिसेंबरला आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावर लोकोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या लोकोत्सवात वीस राज्यातील लोक सांस्कृतिक पथके वेगवेगळ्या दिवशी आपली कला सादर करणार आहेत. पश्चिम सांस्कृतिक केंद्राच्या (Western Cultural Center) सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याशिवाय शंभर वैदूची वनौषधी (Herbal medicine) दालने, आदिवासी खाद्य पदार्थ, कंदमुळे,आदीवासी संस्कृतीप्रदर्शीत करणारी दालने लोकोत्सवात असणार आहेत.

कायम स्वरूपी आदर्श ग्राम प्रक्रिया पन्नास टक्के पूर्ण झाली आहे. येत्या वर्षभरात आमोणे येथे कायम स्वरुपी आदर्श ग्राम तयार होणार आहे. या ठिकाणी वर्षातील 365 दिवस पर्यटकांना (Tourists) राहण्याची सोय करण्यात येईल. त्यांना कृषी पर्यटन, साहसी पर्यटन,वन पर्यटन, आदिवासी पर्यटन याचा जवळून अनुभव घेण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यातूनच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकोत्सवात (folk festival) आदर्श युवा वेगवेगळ्या मान्यवराचा यावेळी त्याच्या कार्याबद्धल गौरव करण्यात येणार आहे. आदर्श युवा संघाचा लोकोत्सव युवकांना एकत्र आणण्याबरोबरच येथील सांस्कृतिक व सामाजिक एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आदिवासी व ग्रामीण संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे माजी मंत्री रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT