Zakir Hussain 3Day Police Custody: वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी स्फोटके साठवून ठेवणाऱ्या झाकीर हुसेनला मंगळवारी (11 फेब्रुवारी) न्यायालयाने दणका दिला. सोमवारी (10 फेब्रुवारी) वाळपई पोलिसांनी झाकीरला स्फोटके साठवून ठेवल्याबद्दल हातवाडा येथून अटक केली होती. मंगळवारी पोलिसांनी झाकीरला न्यायालयात हजर केले. न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी अधिक तपासासाठी झाकीरच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य करत झाकीरला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी झाकीरने स्फोटके साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Police) एक पथक तयार केले, ज्यामध्ये पोलिसांबरोबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी स्टाफ आणि बाँब निकामी पथक होते. हे पथक हातवाडा येथील झाकीरच्या घरी अटक वॉरंट घेवून पोहोचले. पथकाने झाकीरला ताब्यात घेतले. पोलिसांनी यावेळी झाकीरकडून गावठी बॉम्ब, कोयता आणि सुरी जप्त केली. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबत झाकीरने मान्य केले की, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी त्याने ही स्फोटके साठवून ठेवली होती.
पोलीस निरीक्षक (PI) विदीश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. त्यांना PSI प्रतिमेश गवस, पोलीस शिपाई (PC) 6636 गोव्रेश नाईक आणि पोलीस शिपाई (PC) 6586 प्रशांत सुतार यांनी सहाय्य केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.