Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घातपात की अपघात? पणजीच्या ला कॅम्पला कॉलनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

La Campala Colony dead body: राजधानी पणजीतील ला कॅम्पला कॉलनी परिसरात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राजधानी पणजीतील ला कॅम्पला कॉलनी परिसरात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

कॉलनीतील रहिवाशांना एका ठिकाणी संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. मृत व्यक्तीचे वय आणि ओळख अद्याप पटलेली नाही. हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे की यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची गांभीर्य लक्षात घेता पणजी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) पाठवण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीही तपासल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT