Murder At Bicholim And Madel: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दोन खूनांनी गोवा हादरला; डिचोलीत नग्नावस्थेत तरूणाचा मृतदेह, माडेलमध्ये कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

Akshay Nirmale

Murder At Bicholim And Madel: बुधवार, 30ऑगस्टची सकाळ एकीकडे रक्षाबंधनाच्या सणाने साजरी होत असतानाच गोमंतकीयांना हादरवणारी देखील ठरली.

गोव्यात बुधवारी सकाळी दोन खून झाल्याच्या घटना समोर आल्या. यापैकी एक खून डिचोलीत झाला असून दुसरी खुनाची घटना मादेळ फातोर्डा येथून समोर आली आहे.

उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील नदीच्या किनारी असलेल्या सेतू संगम या विरंगुळ्याच्या ठिकाणी एका तरूणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी सकाळी या तरूणाचा मृतदेह घटनास्थळी नग्नावस्थेत आढळून आला. रमेश गवळी असे या तरूणाचे नाव असल्याचे समजते. तो मूळचा बेळगावचा आहे.

रमेश हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता. त्याचे लग्न झाले असून त्याची पत्नी बेळगावमध्ये राहत असल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये तो या परिसरात एका महिलेसोबत आढळून आला होता. तो सेतू संगम परिसरातच राहत होता, असे कळते.

पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडे चौकशी केली जात आहे. सध्या फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी तपास करत आहे.

दरम्यान, या खूनाचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. यावेळी सेतू संगम येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दुसरा खून माडेल फातोर्डा येथे झाला आहे. येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवर हा खून झाला आहे. एका कामगाराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला गेल्याचे समोर आले आहे.

घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. या खूनामागे दुसऱ्या एका कामगारावर संशय व्यक्त केला जात आहे.

मृत कामगार परप्रांतीय असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. फातोर्डा पोलिसांनी संशयित कामगाराला अटक केलेली आहे. सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. दोघेही कामगार रोजंदारीवर काम करत होते, असे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT