Goa knife attack Dainik Gomantak
गोवा

Crime News: चाकू हल्ल्याच्या दोन घटनांनी खळबळ! 'जीआयएम'च्या विद्यार्थिनीवर हल्ला; दुसरीकडे आमदाराच्या भावाला भोसकले

Goa knife attack: गोव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाकू हल्ल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पर्ये येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (GIM) वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाकू हल्ल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पर्ये येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (GIM) वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. तर आगशी येथील बार आणि रेस्टॉरंटमध्ये आमदार वीरेश बोरकर यांचे बंधू साईश बोरकर यांच्यावर तिघा अज्ञातांनी हल्ला केला. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पर्ये येथील जीआयएम कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक २ मधील खोली क्रमांक २२०५मध्ये ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. तक्रारदार विद्यार्थिनी खोलीत झोपलेली असताना एका विद्यार्थिनीने तेथे प्रवेश करून तिच्या मानेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात तिच्या मानेला दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तसेच हातांवरही कापल्याच्या जखमा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०९ व ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

आगशी येथील बार आणि रेस्टॉरंटमध्ये ४ सप्टेंबर रोजी साईश बोरकर यांच्यावर तिघा अज्ञातांनी हल्ला केल्याची तक्रार आहे. संशयितांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने चाकूने हल्ला केल्याने साईश जखमी झाले.

याप्रकरणी तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही घटनांमागील नेमके कारण आणि संशयितांची ओळख पटविण्याचे काम संबंधित पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT