Goa Miles News Dainik Gomantak
गोवा

Calangute: गोवा माईल्स बुक का केली? स्थानिक टॅक्सी चालकांची कळंगुटमध्ये दादागिरी, पर्यटक आणि चालकाला दिला चोप

Calangute Crime News: एका हॉटेलमधील पर्यटक आणि गोवा माईल्सच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली

Akshata Chhatre

Goa Miles taxi driver and tourist beaten by local taxi drivers

कळंगुट: उत्तर गोव्यातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट या भागात टॅक्सी चालकांमध्ये सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळालं आहे. स्थानिक टॅक्सी चालक आणि गोवा माईल्ससारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये तणाव वाढत असल्याचं दिसून आलंय.

सोमवारी (दि.२४) एका हॉटेलमधील पर्यटक आणि गोवा माईल्सच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.

कळंगुटमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पर्यकांनी गोवा माईल्स टॅक्सी बुक केली होती. टॅक्सी हॉटेलजवळ पोहोचल्यावर, स्थानिक टॅक्सी चालकांच्या एका गटानं टॅक्सीला हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं आणि काही अंतरावर थांबायला भाग पाडलं.

जेव्हा पर्यटक बुक केलेली टॅक्सी शोधायला बाहेर आले, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या स्थानिक टॅक्सी चालकांनी त्यांना घेरलं आणि मारहाण केली, ज्यात ते जखमी झाले आणि त्यांच्या वस्तूंचंही नुकसान झालं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी अशीच एक तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यात गोवा माईल्सच्या चालकाला स्थानिक टॅक्सी चालकांनी मारहाण केल्याचा आरोप होता.

या घटनेच्या तक्रारीनंतर आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि गोवा पोलिसांनी या प्रकरणातील तिघा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींची नावं लक्ष्मण साळगावकर (३३), मुकेश मटकर (४०) आणि हेमंत मलिक (३३) आहेत. हॉटेल व्यवस्थापनकडून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

Anjuna Theft: गोव्यात सुपर मार्केटमध्ये केली चोरी, थेट सापडला नेपाळ बॉर्डरवर; संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Rain: गोवेकर काळजी घ्या! जोरदार पाऊस, उंच लाटांची शक्यता; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

Pernem Malpe: चालकाला टॅक्सीतून बाहेर काढले, धारदार शस्त्रांनी केला हल्ला; पेडणे प्रकरणातील तिघे संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT