Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: तरुणीच्या गुढ मृत्यूचा गुंता वाढला

कुटु़बियांचे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह (Goa Crime)

Santosh Govekar

कळंगुटच्या किनाऱ्यावर गुरुवारी पहाटे अर्धनग्न मृतावस्थेत (Half-naked Death) आढळून आलेल्या नाश्नोळा हळदोणा (Nasnoda - Aldona) येथील तरुणीच्या मृत्यूस चार दिवस उलटले तरी स्थानिक पोलिसांकडून याबाबतीत कासवाच्या गतीने तपास चालू असल्याबद्दल (Slow Investigation) कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police) याबाबतीत तरुणीच्या जवळच्या  कुटुंबीयांची भेट घेत तपासाला गती देण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती गोळा करून घेतल्याचे समजते. दरम्यान, कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ नेहमीप्रमाणेच तरुणीच्या मृत्यु प्रकरणात प्रसार माध्यमांना योग्य माहिती पुरवत नसल्याचा आरोप याभागातील जागतिक किर्तीचे व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रिकार्डो डिसौझा यांनी केला असून जनक्षोभाचा उद्रेक होण्याची पोलिसांनी वाट न पाहाता प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन केले आहे. (Goa Crime)

दरम्यान, बुधवारी सकाळी गिरी येथील बस थांब्यावर उतरताच पणजीच्या दिशेने जाणारी प्रवासी बसगाडी थांब्यावर पोहोचल्याने तरुणी त्या बसमध्ये चढल्याचे ग्रुहीत धरून आपण मोटरसायकल म्हापशाच्या दिशेने वळविल्याचे तरुणीच्या वडीलंनी सांगितले. मात्र, सकाळी अकरा वाजेपर्यंत ती पर्वरीतीला कामाच्या ठिकाणी न दिसल्याने त्याच ठिकाणी काम करणार्या तरुणीच्या सख्ख्या मावस बहिणीचा घरी फोन आल्याने घरातील मंडळी चक्रावून गेल्याचे जवळच्या नातलगाने सांगितले. दरम्यान, तरुणीचे वडील यांनी वायंगणवाड्यात वर्षभरापुर्वीच नव्यानेच बांधकाम केलेल्या स्वताच्या एक मजली घरात सध्या हिंदी भाषीक तरुण भाडोत्री म्हणून राहातात पोलिसांकडून अशावेळी सगळ्यांचीच सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना तिसऱ्या कोनातून आवश्यक माहिती गोळा करण्याची तसदी घ्यावी. मृत तरुणी खेळकर स्वभावाची असल्याने सहज दुसर्यांत मिसळून जाण्याकडे तिचा कल होता त्यामुळे कुणातरी ओळखीच्या माणसांकडूनच तिचा घात झाल्याचा दाट संशय तिच्या मावशीने दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले. किनाऱ्यावर आढळलेला अर्धनग्नावस्थेतील तरुणीचा मृतदेह बुडुन मरण पावल्याची विशेष चिन्हे दाखवत नव्हता. उघडे डोळे आणि सडपातळ बांध्याची तरुणी किनाऱ्यावर तासाभरापुर्वीच झोपल्यागत वाटत होती तसेच तिच्या तोंडात किनाऱ्यावरची माती गेल्याची चिन्हे दिसत नव्हती.

दरम्यान, बेपत्ता तरुणी बाबतीत पोलिस तक्रार करण्यासाठी म्हापसा पोलिसांत गेलेल्या तरुणीच्या वडिलांना तेथील कर्मचार्यांनी कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता चोवीस तास थांबण्याचे सांगितले. तथापि बुधवारी दुपारपर्यंत तपासाला गती मिळाली असती तर कदाचित तरुणीचे प्राण वाचले असते त्यामुळे सध्याच्या पोलिस तपासावर आपला विश्वास नसल्याचेही सौ. मोरजकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या गुढ म्रुत्युचा छडा लावण्याचे कडवे आव्हान सध्या गोवा पोलिसांसमोर असून दोषी व्यक्ती जो पर्यंत जगसमोर येणार नाही तोपर्यंत गप्प न बसण्याचा धाडसी निर्णय तरुणीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT