Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime Crime: महिला पर्यटकाचा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

26 वर्षीय महिलेने अगोंडा येथे आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime : कझाकिस्तानवरून आलेल्या 26 वर्षीय महिलेने अगोंडा येथे आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटनासाठी ही महिला आपल्या काही साथीदारांसोबत गोव्यात आली होती. महिलेचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत तिथल्या काही स्थानिकांनी पहिला. अयातोवा खलिदा असे या महिलेचे नाव आहे.

काणकोण पोलिस (Police) निरीक्षक प्रवीण गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या साथीदारांसोबत 19 जानेवारीला अगोंडा बीचवर राहण्यासाठी आली होती. महिलेसोबात आलेल्या पर्यटकांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी 12:30च्या सुमारास त्यांनी अगोंडा (Agonda) येथे चहा-नाश्ता केला. आणि तेव्हापासून तिच्या वागण्यात अचानक बदल झाला असल्याचा त्यांना जाणवला. तिने आपल्या ग्रुपसोबत बाहेर फिरायला जाण्यास नकार दिला.

त्यानंतर साधारण 2:30 च्या सुमारास खलिदा हिने अघोळ केली आणि आणि बाहेर फेरफटका मारायला गेली. दरम्यान तिचे सोबती समुद्रकिनाऱ्यावर धमाल-मस्ती करत असताना खलिदाच लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी केपे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन चाचणीसाठी मडगावला पाठवला आहे. प्राथमिक माहितीत समोर आल्याप्रमाणे, महिलेच्या शरीरावर कोणत्याही खुणा नाहीत. यासंबंधी पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT