Goa Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn: सनबर्न जल्लोषानंतर अटकेला सुरुवात; ड्रग्स सेवन केल्याने स्थानिकांसह पाचजणांची धरपकड

Drug Arrest at Goa Sunburn: सनबर्न संगीत महोत्सवातून एकूण पाच जणांनी अमलीपदार्थाचे सेवन केल्याची माहिती उघड झाली

Akshata Chhatre

Crackdown at Sunburn Goa

धारगळ: गोव्यात सध्या नवीन वर्षाचा जल्लोष सुरु आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातून पर्यटक गोव्याला आलेत. गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी दलाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अमलीपदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु असून पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार सनबर्न संगीत महोत्सवातून एकूण पाच जणांनी अमलीपदार्थाचे सेवन केल्याची माहिती उघड झाली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या पाच संशयितांपैकी एक परदेशी म्हणजेच टेक्सास (यूएसए) येथील असून बाकी तिघे हैदराबाद, चेन्नई, मध्य प्रदेशातील व्यक्ती आहेत. यांच्या सोबत असलेला शेवटचा संशयित आरोपी हा स्थानिक रहिवासी असून तो कुंक्कळीमधला आहे.

अमलीपदार्थ विरोधी दलाकडून केलेल्या चाचणीतून या पाचही जणांनी अमलीपदार्थांचे सेवन केल्याची पुष्टी झाली, पैकी चार जणांची चाचणी गांजासाठी पॉझिटिव्ह आली, तर एकाची चाचणी कोकेनसाठी पॉझिटिव्ह आली आहे. पोलिसांनी सध्या या पाचही जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी दलाचे पोलीस अधीक्षक तिकम सिंग वर्मा यांनी दिली.

यापूर्वी पोलिसांनी सचिन हळदणकरला एक्स्टसी आणि चरसस बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. याव्यतिरिक्त, नायजेरियन नागरिक जोसेफ उझोरला कोकेनसह पर्रा येथे पकडण्यात आले. आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या टोळीचा प्रमुख गुड्डू मोची राम याचा अस्नोडा येथे १३ किलो गांजा जप्त केल्यानंतर झारखंडमध्ये अटक करण्यात आली होती. शिवाय दिल्ली पोलिसांच्या मदतीने २.५ कोटींचा कोटी चरस जप्त करत अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जेठालालच्या 'त्या' पत्नीला धक्का! तारक मेहता फेम अभिनेत्रीचा 'घटस्फोट'; 13 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय

सायंकाळपर्यंत टाळा उघडा! हायकोर्टाच्या जुन्या इमारतीला टाळा ठोकल्याप्रकरणी, 'हा खूप गंभीर प्रकार आहे', म्हणत कोर्टाने गोवा सरकारला झापलं

Goa Pollution: समुद्र प्लॅस्टिकने भरला, नद्या सांडपाण्याच्या विळख्यात! मार्टिन्स करो, प्रदूषणाचा विळखा सुटो..

Ganesh Idol: आजी-आजोबा 'हो' म्हणाले, छोट्या अस्मीने स्वतःच बनवली 'गणेशमूर्ती'; पारंपरिक मातीच्या मूर्तींची जागरूकता

Goa Live News: करूळ घाटात दरड कोसळली, गोवा -कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT