Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: मजूर महिलेवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी परप्रांतीयाला अटक; वेर्णा पोलीसांची कारवाई

Goa Crime Case: सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून महिला, तरुणी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: एका मजूर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जॉयराम कलिता (मूळ रा. आसाम; वय- 42 वर्ष) याला कलम IPC कलम 376 506(2) अन्वये अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकार 12 फेब्रुवारी रोजी घडला होता, मात्र आज गुरुवारी त्या पीडित महिलेने वेर्णा पोलीस स्टेशन गाठत कलीता या इसमाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जॉयराम कलिता हा वेर्णा येथील अनेक उद्योगांसाठी कामगार पुरवठादार म्हणून काम करतो.

पीडित महिला जेव्हा त्याच्याकडे काम मागण्यासाठी आली तेव्हा त्याने तिला आपल्या फ्लॅट शेजारची दुसरी खोली राहायला दिली.

12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास आसपास कुणी नाही हे हेरून त्याने पीडित महिलेला खोलीत प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचे दुष्कृत्य केले.

तसेच त्या नंतर त्याने पीडितेला झालेल्या प्रकाराविषयी कुणाला काहीही सांगू नकोस अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली.

मागील दोन दिवस पीडिता जिवाच्या आकांताने शांत राहिली होती. मात्र आज गुरुवारी अखेर तिने वेर्णा पोलीस स्टेशन गाठत जॉयराम कलिता याचा विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कलिता याला ताब्यात घेत त्याला IPC कलम 376 506(2) अन्वये अटक केली आहे.

सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून महिला, तरुणी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

काल बुधवारी उसगाव येथे कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर 'आपल्या प्रेमाला नकार दिल्याच्या रागाने' एका युवकाने बियरची बाटली मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.

त्या युवतीवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही घटनांमधून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT