म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका अंडर ट्रायल कैद्याला चरस तस्करी करताना पकडण्यात आले. त्याच्याकडून ९४ हजार रुपये किमतीचे चरस हस्तगत करण्यात आले. संशयिताने सँडलमध्ये हे अमली पदार्थ लपविले होते.
उपलब्ध माहितीनुसार, कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शंकर गावकर यांनी संशयित सर्गेई रोझनोव्ह, जो रशियन नागरिक आहे, त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्याकडे ९४ हजार रुपये किमतीचे चरस आढळले. ते पातळ पारदर्शक पॉलिथिनमध्ये गुंडाळले होते आणि दोन फिल्टर पेपरचे गुच्छ होते.
यापूर्वी देखील पोलिसांनी कोलवाळमध्ये केलेल्या कारवाईत अडीच लाखाचा गांजा बाळगणाऱ्या एकाला अटक केली होती. ही कारवाई 20 ऑक्टोंबर रोजी रात्री करण्यात आली.
गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधातील कारवाई वेगाने सुरु केली असल्याने त्यामुळे राज्यात अमली पदार्थाविरोधातील कारवायांचा धडाका सुरु आहे.
कोलवाळ पोलिसांना एक व्यक्ती कोलवाळ येथे गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी कोलवाळ परिसरात सापळा रचला असता यावेळी अनिकेत कुमार या मुळचा बिहारचा रहिवासी असणाऱ्या 23 वर्षीय संशयिताला अटक केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.