Goa Drugs Seized Dainik Gomanak
गोवा

Goa Drugs Seized: हरमल येथे ड्रग्ज तस्करीप्रकरणी रशियन महिलेला अटक; 4 लाखाचे अमली पदार्थ जप्त

अँटी नार्कोटिक्स पथकाचा छापा

Akshay Nirmale

Goa Drugs Seized: गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुरूवारी उत्तर गोव्यातील हरमल (Arambol) येथील खालचावाडा या भागात छापा टाकला. यात ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एका रशियन महिलेला अटक करण्यात आली आहे.

या संशयित महिलेचे नाव मार्गारिटा पिगिना (38 वर्षे) असे आहे. पोलिसांनी तियाकडून 4 लाख रुपये किंमतीचे 800 ग्रॅम चरस जप्त केले आहे.

पोलिसांना या भागात ड्रग्ज तस्करीची गुप्त माहिती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने येथे छाप्याची तयारी केली होती. संबंधित रशियन महिला येथे आली असता तिला रंगेहाथ पकडण्यात पथकाला यश आले. तिच्याकडे सध्या चौकशी केली जात आहे.

दरम्यान, गोव्यातील हरमल, हणजुणे भागात पर्यटन हंगामाच्या काळात ड्रग्ज तस्करीचे प्रकार उघडकीस येत असतात. गोव्यात सध्या पर्यटन हंगामास सुरवात झाली आहे. रशियन पर्यटकांना घेऊन पहिले चार्टर विमान गोव्यात एक ऑक्टोबर रोजी दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

SCROLL FOR NEXT