Goa Crime | Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रवी शिरोडकर हल्ला प्रकरणी; आणखी 5 संशयितांना अटक

Goa Crime: आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहावर गेली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: रवी शिरोडकर हल्लाप्रकरणी हणजुण पोलिसांनी काल पहाटे आंबोली (महाराष्ट्र) येथे दडून बसलेल्या आणखी पाच आरोपींना सापळा रचून अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहावर गेली आहे.

म्हापसा पोलिसांनी प्रकरणातील संशयितांची माहिती देण्याकरिता आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उप अधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, उप निरीक्षक साहिल वरक उपस्थित होते.

आतापर्यंत टार्जन पार्सेकर,(हडफडे), शैलेश चंदु नाईक, (कामुर्ली-बार्देश), सिद्धांत सुर्यकांत मांद्रेकर (गोलेतीवाडा-साळगाव), अमन रोहिदास शिरोडकर (निगवाडा-साळगाव), प्रशांत दासा राजू (परप्रांतीय, सध्या रा.नागवा), राजेश उर्फ वुडू केरकर (मरड-साळगाव) सागर पाटील, साहिल पेडणेकर, सागर वावलापी (परप्रांतीय, सध्या रा.कांदोळी), श्रेणीत साखळकर (साळगाव) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मनोजच्या सांगण्यावरुनच हल्ला-

या हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुन्हेगार गजेंद्र सिंग उर्फ छोटु (सध्या तुरुंगात असलेला) याचा छोटा भाऊ मनोज सिंग याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सध्या हणजुण पोलिस त्याच्या मागावर आहेत. हल्ल्याच्या वेळी मनोज सिंग संशयित टार्जन पार्सेकर यांच्या गाडीत होता. मनोजच्या सांगण्यावरुनच शिरोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे अधीक्षक दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT