Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्रेषित महंम्मदांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा पोलिसांच्या ताब्यात, कबुलीनंतर तरुणाला अटक

सायबर क्राईम कक्षाचे विकास देईकर आणि त्यांचे पथक या प्रकरणाची माहिती मोबाईल कंपन्यांकडून मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: इन्स्टाग्रामवर प्रेषित महंम्मद तसेच अल्ला यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संशयित सूत्रधाराचा छडा लावण्यात सायबर क्राईम पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय गोमंतकीय तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी फोंडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संशयित तरुण बेरोजगार असून त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

फोंडा, मडगाव, वाळपई तसेच पणजी पोलिस स्थानकात यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अधिक चौकशी जिल्हा पोलिस करतील, अशी माहिती सायबर क्राईम कक्षाचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी फोंडा व मडगाव पोलिसांनी सायबर क्राईम पोलिसांची मदत घेतली.

गेल्या चार दिवसांपासून सायबर क्राईम कक्षाचे निरीक्षक विकास देईकर आणि त्यांचे पथक या प्रकरणाची माहिती मोबाईल कंपन्यांकडून मिळवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर ही माहिती हाती लागताच संशयिताला आज ताब्यात घेण्यात आले.

त्याने इन्स्टाग्रामवर जो आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता, त्याची कबुली दिली असून त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटचीही माहिती जमा केली आहे. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून पुढील चौकशीसाठी त्याला ज्या पोलिस स्थानकात तक्रारी दाखल आहेत, त्यांच्याकडे सोपविले जाईल, असे कौशल यांनी सांगितले.

इन्स्टाग्रामवरून आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या कृत्याचा निषेध नोंदवला होता व विविध पोलिस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवून संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात मुस्लिम बांधवांना संशयितावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे सांगितले होते. सायबर क्राईमने सूत्रधाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची माहिती फोंडा पोलिसांना देण्यात आली.

‘तो’ मनोरुग्ण : पालकांचा दावा

या प्रकरणातील संशयित हा मानसिक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारासंदर्भातील दस्तावेजाची अद्याप पोलिसांकडून पडताळणी करण्यात आलेली नाही. त्याची तपासणी संबंधित अधिकारी करतील, असे अक्षत कौशल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT