पेडणे: उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी समीर कोरगावकरच्या विरोधात तक्रार करण्यात आलीये. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच १४ एप्रिलच्या दिवशी ही घटना घडली होती. याबद्दलची पोलीस तक्रार नोंदवायला गेले असता पोलिसांनी कारणं देत तक्रार नोंदवायला टाळाटाळ केली.
पालक आणि स्थानिकांनी निदर्शने नोंदवल्यानंतर आता गोवा पोलिसांनी संशयित आरोपी समीर कोरगावकर याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पण एखाद्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी एवढा वेळ का घेतला जातो असा सवाल पीडित मुलीच्या पालकांनी उपस्थित केलाय.
गुन्ह्याची तक्रार नोंदवायला स्थानकात गेली असता पीडितेच्या आईला अल्पवयीन मुलीला स्थानकात घेऊन येण्यास सांगितलं गेलं, यानंतर पीडितेला संशयित आरोपीविरुद्ध नक्की गुन्हा नोंद करायचा आहे का? असे प्रश्न विचारले गेल्याचा खेद तिच्या आईने व्यक्त केलाय.
जिथे पोलिसांनी मुलीला धीर देत आरोपीला पडकून देण्याचं आश्वासन दिलं पाहिजे तिथं पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली.
पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे जर का आरोपी मोकाट फिरू लागले तर मुलींची सुरक्षा कशी होणार असा आक्रोश पीडित मुलीच्या आईने व्यक्त केला.
पोलिसांनी फिर्यादी पक्षाजवळ २४ तासांचा अवधी मागितला होता, त्याप्रमाणे वाट बघून आता स्थाकाबाहेर निदर्शने सुरु करण्याची वेळ आली असल्याचं स्थानिक म्हणाले. पोलीस जर का आरोपीला पडकू शकणार नसतील तर त्याला हुडकून काढण्याची जबाबदारी आमच्याकडे सोपवा, त्याला शोधून पोलिसांसमोर उभा करू असं स्थानिक म्हणाले होते. या निदर्शनच्यावेळी पोलिसांकडून स्थानिकांना अशिक्षित म्हटल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.