Police squad with laptop thief in Pernem (Goa Crime)
Police squad with laptop thief in Pernem (Goa Crime) Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पेडणे येथे लॅपटॉप प्रकरणी एकाला अटक

Nivrutti Shirodkar

एका मित्राचा विश्वासघात करून लॅपटॉप चोरी (Laptop Robbery) केल्या प्रकरणी पेडणे पोलिसांनी (Pernem Police) 16 ऑगस्ट रोजी रोहित लक्ष्मण गायके शिवाजीनगर शिरूर कासार रोड बीड पुणे (Pune) या युवकाला कांदोळी (Candolim) येथे अटक केली. पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी (Police Inspector Jeevba Dalvi) यांनी दिलेल्या माहिती नुसार सैतेजा चिरंजीवी / सत्यनारायण डोमेटी व त्याचा एक मित्र रोहित मोरजी येथील एका हॉटेलात रूम पार्टनर म्हणून राहत होते. एकाच रूम मध्ये राहत असल्याने सैतेजा चिरंजीवी यांनी आपला किमती लॅपटॉप वापरायला दिला होता, आपण बाथरूम मध्ये गेल्यावर मित्राने आपला लॅपटॉप पळवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली. (Goa Crime)

लगेच संशयीताने आपला मोबाईल फोन बंद केला होता. ही घटना 3 ऑगस्ट रोजी घडली होती. 16 ऑगस्ट रोजी संशायीतानी आपला फोन चालू केला होता. पोलिसांनी लगेच एक पथक तयार केले आणि फोनचे लोकेशन कांदोळीचे असल्याचे कळले. एक पोलीस पथक कांदोलीळा गेले. तपासादरम्यान आरोपी व्यक्तीचा तपशील त्याच्या मोबाईल क्रमांकासह गोळा केला आणि त्याचा मोबाईल नंबरवर पाळत ठेवण्यात आली. आरोपीने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता आणि राहण्याची जागा बदलून फिरत होता. पोलिसांनी कांदोळी येथे एका हॉटेलात जावून संशयिताला अटक केली.चौकशी दरम्यान संशयिताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि सांगितले की त्याने पणजी येथील संगणक दुकानात हा लॅपटॉप विकला आहे. त्यानुसार पोलिसांनी, त्या दुकानावर छापा टाकून लॅपटॉप जप्त केला. त्याची किमात 1 लाख 34 हजार 990 रुपये आहे.

संशयित व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून गोव्यात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहत होता. त्याने गोव्यात असेच गुन्हे केले असल्यास त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी, पोलीस उपनिरीक्षक विवेक हलरणकर , हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पार्सेकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेनकर, विनोद पेडणेकर आणि रोहन वेलगेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हि कारवाई केली..पुढील तपास पीआय जीवबा दळवी, पोलीस उपाधीक्षक गजानन प्रभुदेसाई उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Today's Live Update: मांगोर येथे घरफोडी; 2.5 लाखांचे दागिने, रोकड लंपास

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Kotak Mahindra Bank: RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेला ग्रहण, दोनच दिवसात गमावले 47 हजार कोटी; शेअर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण

SCROLL FOR NEXT