Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: "बारावीच्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही" शाळेच्या निर्णयामुळे विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन

Student suicide in Vasco Bayna Goa: बारावीच्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही, असे सांगितल्याने सासमोळे–बायणा येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को : बारावीच्या परीक्षांमध्ये प्रगती चांगली नसल्याने एका उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारीला होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही, असे सांगितल्याने सासमोळे–बायणा येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्राप्त माहितीनुसार सदर विद्यार्थिनी एका उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होती.

तिची आतापर्यंतच्या परीक्षेत प्रगती नीट नसल्याने विद्यालयाने तिच्या पालकांना बुधवारी बोलावले होते. त्यामुळे ती आईवडिलांसह बुधवारी विद्यालयात गेली होती. तेथे शिक्षकांनी तिच्या आईवडिलांना तिच्या प्रगतीसंबंधी सांगितले. ती बारावी परीक्षेत उतीर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तिला परीक्षेला बसू देण्यात येणार नसल्याचे सांगितले.

तसेच त्यांच्याकडून काहीतरी लिहून घेण्यात आले. आपणास परीक्षेला बसता येणार नाही, याचा त्या विद्यार्थिनीच्या मनावर मोठा परिणाम झाला.ती विद्यालयाबाहेर आल्यावर तिला चक्कर आली. आईवडिलांनी तिला सावरले. नंतर ते घरी आले.तिची आई भाजी विकते. तर वडील खासगी काम करतात. त्यामुळे तिची समजूत काढून आईवडील घराबाहेर पडले.

अन्‌ तिने गळफास घेतल्याचे दिसले!

पालक सायंकाळी उशिरा घरी आल्यावर त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलाकडे विचारपूस केली. तेव्हा ती शौचालयात गेली आहे. पण बराच वेळ न परतल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्यांनी शौचालयाकडे धाव घेतली. तेव्हा तिने गळफास घेतल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जमिनीच्या वादांना बसणार पूर्णविराम? 'नक्शा' प्रकल्पाद्वारे प्रत्येक मालमत्तेला मिळणार युनिक डिजिटल आयडी

'मराठी माणूस' फॅक्टर ठरणार गेमचेंजर! भाजपच्या 'डबल इंजिन'ला 'ठाकरे बंधूं'चं तगडं आव्हान- संपादकीय

Surya Gochar 2026: 15 जानेवारीपासून नशीब पालटणार! 'या' 4 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; पुढील 30 दिवस होणार धनवर्षाव

Illegal Construction: माजी नगरसेवकासह मुख्य अधिकाऱ्यांना नोटीस, कुंकळ्ळीत बेकायदेशीर बांधकाम प्रकरण; शेतजमिनीत दोन बंगले

Goa Crime: चोर तर चोर, वर शिरजोर! लुटलेली सोनसाखळी बँकेत गहाण ठेवून घेतलं कर्ज, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT