गोवा

Goa Crime: खाऊ देण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलीवरील दुष्कृत्याप्रकरणी तिघे दोषी

Goa Juvenile Court: बांधकाम इमारतीच्या ठिकाणी कामाला असलेल्या कामगाराच्या सहा वर्षाच्या मुलीवरील बलात्कारप्रकरणी बाल न्यायालय अध्यक्षांनी तिघा संशयितांना दोषी ठरवले आहे.

Manish Jadhav

पणजी: बांधकाम इमारतीच्या ठिकाणी कामाला असलेल्या कामगाराच्या सहा वर्षाच्या मुलीवरील बलात्कारप्रकरणी बाल न्यायालय अध्यक्षांनी तिघा संशयितांना दोषी ठरवले आहे. आरोपी रवी रई, जयदीप रई आणि मनोज कुमार या तिघांविरुद्धचे पुरावे सिद्ध होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यांना येत्या बुधवारी (22 जानेवारी) शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

काणकोण पोलिसांनी एप्रिल 2018 मध्ये या घटनेचा गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबानीत तिघा आरोपींची नावे घेतली होती, त्यानुसार त्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध बलात्कार, अपहरण तसेच बाल कायद्याच्या कलम 8 (2) खाली गुन्हा दाखल करुन तपास केला होता. पीडित मुलीची तसेच आरोपींची (Accused) वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ठोस पुरावे जमा करुन बाल न्यायालयात या तिघांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन काणकोण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशल देसाई यांनी केला होता.

एके दिवशी या पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आपल्या भावाकडे केली असता त्याने वडिलांच्या निदर्शनास आणून दिली. तिची विचारपूस केली असता तिने आरोपींकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे वडिलांनी काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. बिगर सरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुलीची जबानी पोलिसांनी नोंदवली.

दरम्यान, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर आरोपींविरुद्ध बलात्कार, अपहरण तसेच लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करुन तपास अधिकारी प्रशल देसाई यांनी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यावरील सुनावणीवेळी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारावर या तिघांनाही दोषी धरण्यात आले आहे.

सुरक्षारक्षकांचे कृत्य

पीडित मुलीचे वडील हे नगर्से - काणकोण (Canacona) येथील बांधकाम इमारतीच्या ठिकाणी कामाला होते. हे कुटुंब मूळ उत्तरप्रदेशमधील असून कामानिमित्त ते गेल्या अनेक वर्षापासून गोव्यात आहे. त्याच ठिकाणी ते झोपड्यांमध्ये राहत होते.

घटनेच्या तीन महिन्यांआधी या मुलीच्या आईचे निधन झाले होते, त्यामुळे या झोपडीमध्ये ती व तिचे वडील राहत होते. या बांधकामाच्या ठिकाणी आरोपी हे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. मुलीचे वडील कामाला गेल्यावर शाळेत जाणारी ही मुलगी एकटीच झोपडीत असायची. त्याचा फायदा घेऊन हे आरोपी आलटून पालटून तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून निर्जनस्थळी घेऊन जात होते व तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT