South Goa Crime: दक्षिण गोव्‍यात गुन्हेगारी वाढली! खुनांच्‍या प्रकरणात लक्षणीय वाढ; सासष्टी अग्रेसर

South Goa Crime Analysis: मागच्‍या २०२४ या सालात दक्षिण गोव्‍यात जी खुनांची प्रकरणे घडली त्‍यांचा पोलिसांनी शंभर टक्‍के तपास लावला असला तरी २०२३ च्‍या तुलनेत या खुनांच्‍या प्रकरणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे.
South Goa Crime: दक्षिण गोव्‍यात गुन्हेगारी वाढली! खुनांच्‍या प्रकरणात लक्षणीय वाढ; सासष्टी अग्रेसर
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मागच्‍या २०२४ या सालात दक्षिण गोव्‍यात जी खुनांची प्रकरणे घडली त्‍यांचा पोलिसांनी शंभर टक्‍के तपास लावला असला तरी २०२३ च्‍या तुलनेत या खुनांच्‍या प्रकरणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे. २०२३ मध्‍ये दक्षिण गोव्‍यात फक्‍त ९ खूनांच्‍या प्रक़रणांची नोंद झाली होती. २०२४ सालात ही संख्‍या १३ वर पोचली. असे जरी असले तरी २०२२ च्‍या तुलनेत या दोन्‍ही वर्षांची संख्‍या समाधानकारक म्‍हणावी लागेल. कारण २०२२ मध्‍ये दक्षिण गोव्‍यात तब्‍बल २५ खुनांची नोंद झाली होती.

पोलीस आंकडेवारीवरुन जी माहिती प्राप्‍त झाली आहे त्‍यानुसार दक्षिण गोव्‍यातील (South Goa) सासष्‍टी तालुक्‍यात अशाप्रकारच्‍या गुन्‍हेगारींचे प्रमाण अधिक वाढलेले असून या तालुक्‍यात वाढलेली बिगर गोमंतकीय स्‍थलांतरीतांची संख्‍या मुख्‍य कारण असल्‍याचे सांगितले जाते. २०२४ मध्‍ये दक्षिण गोव्‍यात १० खुनांचा प्रयत्‍न करण्‍याची प्रकरणे नाेंद झाली. २०२३ मध्‍येही हे प्रमाण तेवढेच होते. २०२२ मध्‍ये मात्र ही संख्‍या फकत ७ होती.

South Goa Crime: दक्षिण गोव्‍यात गुन्हेगारी वाढली! खुनांच्‍या प्रकरणात लक्षणीय वाढ; सासष्टी अग्रेसर
South Goa Crime: दक्षिण गोव्यात वर्षभरात 65 गंभीर गुन्ह्यांची नोंद; तपास लावण्‍याची टक्‍केवारी 95 टक्‍के; वाचा संपूर्ण रिपोर्ट

सासष्टीत गुन्‍हेगारी प्रकरणे वाढण्‍यामागचे कारण, बिगर गोमंतकीय स्‍थलांतरित कामगार असल्‍याचे विविध गुन्‍ह्यांच्‍या विश्‍लेषणांवरून सिद्ध झालेले आहे. हे कामगार विशेषत: कर्नाटक, प. बंगाल, उडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्‍ट्र या राज्‍यातील असून यातील ७० टक्‍के कामगार हे एकटेच रहात असल्‍यामुळे त्‍यांच्‍यात दारुच्‍या नशेत झालेल्‍या भांडणामुळे असे गुन्‍हे वाढले आहेत हेही दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com