Goa Crime News |
Goa Crime News |  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला चक्क परतला घरी; मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो कुणाचा?

Akshay Nirmale

Goa Crime News: गोव्याची राजधानी पणजीजवळील आगशी (Agassaim) या गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आगाशीतील एका 59 वर्षांच्या व्यक्तीचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

पण आज, बुधवारी अचानक तीच व्यक्ती चक्क पुन्हा त्याच्या घरी परत आली आहे. त्या व्यक्तीला जिवंत पाहून संबंधित कुटूंबालाही सुरवातीला धक्का बसला आणि नंतर कुटूंबियांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले.

आगशी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी याबाबत सांगितले की, जी व्यक्ती बुधवारी घरी परतली त्या व्यक्तीला यापुर्वी मृत घोषित करण्यात आले होते. मार्कोस मिलाग्रेस (वय 59) असे या व्यक्तीचे नाव आहे.

त्यांच्या कुटूंबियांनी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांत मार्कोस हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पणजी येथे 07 ऑक्टोबर 2023 रोजी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह मिलाग्रेस कुटुंबीयांनी मार्कोसचा असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शवविच्छेदन करून हा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्या मृतदेहावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारही केले.

दरम्यान, आता तब्बल दोन महिन्यानंतर मार्कोस घरी परतला आहे. दोन महिन्यांनंतर मुंबई पोलिसांकडून आगशी पोलिसांना फोन आला. त्यातून मार्कोस मिलाग्रेस असल्याचा दावा तेथील एक व्यक्ती करत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

त्या व्यक्तीला आगशी पोलिस ठाण्यात आणले गेले. त्यानंतर मिलाग्रेस कुटूंबियांनीही मार्कोसला ओळखले आहे. मार्कोसने कुटूंबियांना न कळवता स्वतःहून मुंबईला गेल्याचे सांगितले.

दरम्यान, ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले, तो कुणाचा आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून आता त्याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे, त्यामुळे या एकूणच प्रकरणाबाबत गोव्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT