Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

सावत्र बापाचा खून करून मृतदेह पुरून टाकला; 10 वर्षानंतर लागला खुनाचा छडा

आरोपीवर खुनाचा आरोप निश्चित ; सहकारी आईचे निधन

दैनिक गोमन्तक

मडगाव : पिऊन येऊन रोज आपल्या आईला मारहाण करत असल्यामुळे आपल्या सावत्र बापाचा खून करून नंतर त्याचा मृतदेह आपल्या घरातच पुरून ठेवण्याचा आरोप असलेल्या परशुराम दोरणहल्ली याच्यावर ठेवलेल्या आरोपपत्रात प्रथम दर्शनी तथ्य आढळून आल्याने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी खून करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली आरोप निश्चित केला.

(Murdered stepfather and buried body)

हा खुनाचा प्रकार 2008 साली घडला होता. आके मडगाव येथे एका भाड्याच्या घरात राहत असलेल्या भीमप्पा कोडरगिरी (47) याचा परशुराम याने खून करून नंतर आपली आई रेणुका हिच्या मदतीने तो घरातील संडासमध्ये पुरून वर टाइल्स बसवून ती जागा सपाट केली होती. त्यानंतर आरोपी घर सोडून विजापूर येथील गावी निघून गेली.

10 वर्षाने घरमालकाने घर दुरुस्त करताना संडासाची जागा खोदली असता त्यांना तिथे हाडाचा सापळा आढळून आला. त्यानंतर तपास सुरू होऊन मडगाव पोलिसांनी परशुराम व त्याची आई रेणुका हिला अटक केली. या प्रकरणी सुनावणी चालू असताना रेणुका हिचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT