Mapusa Assault Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: धक्कादायक! म्हापसात प्रेयसीवर प्राणघातक हल्ला; प्रियकर फरार

Mapusa Assault Case: गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून पोलीस प्रशासनासमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान बनले आहे.

Manish Jadhav

Mapusa Assault Case: गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून पोलीस प्रशासनासमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान बनले आहे. यातच, म्हापसामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला.

म्हापसातील ग्रीन पार्क रोडवर ही घटना घडली. कोणत्यातरी गोष्टीवरुन एकमेकांशी बोलत असताना अचानक दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. स्थानिकांनी त्यांना वाद घातलाना पाहिले. त्यांच्यामधील वाद इतका वाढली की, प्रियकराने तिच्यावर हल्ला केला. त्याने तिच्या डोक्यावर स्पॅनरने हल्ला केला, ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. पीडिता वास्को येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर तात्काळ पीडितेला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल आले. दुसरीकडे, पोलिसांना या हल्ल्याविषयी कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. हल्ल्यानंतर प्रियकर पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. वारंवार समोर येत असलेल्या अशा घटनांमुळे राज्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT