Illegal Liquor Seized at Polem Check Post Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor: पिझ्झा घेऊन गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या कंटेनरमधून नेत होते अवैध दारू; पुढे काय झालं वाचाच

30 हजार रूपये किंमतीच्या परदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त

दैनिक गोमन्तक

गोव्यात अवैध गोष्टी घडू नयेत यासाठी गोवा पोलीस प्रशासन आणि अबकारी खाते सदैव तत्पर असते. काणकोण अबकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पोळे तपासणी नाक्यावर 30 हजार रूपये किंमतीचा अवैध मार्गाने कर्नाटकात वाहतूक करण्यात येणारे मद्य जप्त केले. (Illegal Liquor Seized at Polem Check Post)

अबकारी खात्याचे काणकोण कार्यालयाचे अबकारी अधिक्षक चंद्रनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या वाहनात अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा सुगावा लागल्यानंतर तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांनी हे वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यांना त्या वाहनात 30 हजार रूपये किंमतीच्या परदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. अबकारी अधिकाऱ्यानी अवैध मद्याबरोबरच 22 लाख रूपये किंमतीचे वाहन जप्त केले आहे, त्याचबरोबर वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

काणकोण अबकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज पोळे तपासणी नाक्यावर 30 हजार रूपये किंमतीचे अवैध मार्गाने कर्नाटकात वाहतूक करण्यात येणारे मद्य वाहनासह जप्त केले. पिझ्झा घेऊन गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या कंटेनरमधून या मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

UN General Assembly: 'दिवसा सुरक्षेची भाषा, रात्री आतंकवाद...!', संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकड्यांना दणका; अल्पसंख्याकांवरील अत्याचारावरुनही सुनावले खडे बोल

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

SCROLL FOR NEXT