colvale jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: सॅनिटायझर अंगावर ओतून कैद्यानं पेटवलं; कोलवाळ कारागृहात सतावणुकीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale: कोलवाळ कारागृहातील दवाखान्यात आज सकाळी कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो ५० टक्के होरपळला असून त्याला गोमेकॉत दाखल केले आहे.

ही घटना काल (10 ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. उपचारासाठी इस्पितळात नेण्यास तुरुंग अधिकाऱ्यांकडून विलंब झाल्याने त्याची प्रकृती नाजूक बनली आहे. या घटनेची कोलवाळ पोलिस चौकशी करत आहेत. कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सतावणुकीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी कैद्यांमध्ये चर्चा आहे.

कैदी राजू दास याला तेथील दवाखान्यातील काम दिले होते. त्यामुळे तो नाराज होता. त्याने अनेकदा हे काम नको, असे तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, कोणीच ऐकत नसल्याने त्याचे गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन ढळले होते. आज सकाळी दवाखान्यात कैद्यांची तपासणी सुरू होती. त्यावेळी तो सॅनिटायझर घेऊन खोलीत गेला आणि दार बंद केले. त्याने अगोदर सॅनिटायझर प्राशन केले. नंतर अंगावर ओतून आग लावली.

गोवा

नोंदवहीच गायब

कैदी राजू दास याने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा तेथे असलेल्या कैद्यांनी जेलरला माहिती दिली. जेलरने ती तुरुंग अधीक्षकांना दिली. त्यांना येण्यास बराच उशीर झाला. आल्यानंतर या कैद्याला खोलीतून बाहेर काढण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उपस्‍थित कैद्यांकडे चौकशी केली. दवाखान्यात येणाऱ्या - जाणाऱ्यांसाठी नोंदवही ठेवलेली असते. अधिकाऱ्यांना झालेला उशीर नोंद होऊ नये म्हणून ही नोंदवहीच गायब करण्यात आली.

रुग्णालयात नेण्यास झाला विलंब

राजूला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने त्याची प्रकृती घटनास्थळीच खालावली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातून ही माहिती मिळवून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड होऊ शकतो, असे कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीही कारागृहात अनागोंदी कारभार घडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: ते आले, पोलीस ठाण्यात गेले; 20 मिनिटात बाहेर पडले; सुभाष वेलिंगकरांच्या चौकशीच्या वेळी काय घडले?

Dragonfly In Goa: गोव्यात चतुरांच्या प्रजातींमध्ये वाढ! रिसर्चमधून खुलासा; संवर्धनाची गरज

Goa Live Updates: सुभाष वेलिंगकर डिचोली पोलीस स्टेशनमधून रवाना

Goa Police: मांद्रेत उत्तर कोरिया, युगांडाच्या नागरिकांची घुसखोरी, पोलिसांनी दिला दणका

Colva Jail News: कोलवा येथे अंडरट्रायल कैद्याचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न; कारण अद्याप अस्पष्ट

SCROLL FOR NEXT