Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: हैदराबाद येथील तरुणाने गोव्यात संपवले जीवन; दाबोळीत गळफास घेवून आत्महत्या

Goa Crime: हैदराबाद येथील सिरीगम नागराजू (३२) याने दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

गोमन्तक डिजिटल टीम

हैदराबाद येथील सिरीगम नागराजू (३२) याने दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हैदराबाद येथील सिरीगम नागराजू हा दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता.

दरम्यान, बुधवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी दोन वाजता उघडकीस आले. सकाळपासून रुम उघडत नसल्याने कर्मचारी वर्गाने दरवाजा ठोठावला; पण कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला.

तेव्हा त्यांना नागराजू पंख्याला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी लागलीच याची माहिती वास्को पोलिसांना दिली. वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. नागराजू याच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली असून उद्या सकाळी ते गोव्यात पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT