Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: बांधकाम साईटवरील परप्रांतीय मजुरावर प्राणघातक हल्ला; हल्ला करून फेकले नदीत, स्थानिकांनी..

Goa Crime Case: पर्वरी पोलीस घटनास्थळी दाखल

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: गोव्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून एकोशी -पोंबुर्पामधून एक धक्कादायक बाब समोर येतेय. एकोशी मधील एका बांधकाम साईटवरच्या झारखंडमधील एका मजुरांच्या गटाने त्यांच्याच एका सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

हल्लेखोरांनी सदर मजुराला बेदम मारहाण करून त्याला बांधकाम साईट नजीकच्या नदीत फेकून दिलेय. दैवयोगाने त्याला पोहता येत असल्याने त्या मजुराने नदीकाठच्या एका घराचा आसरा घेतला असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार एकोशी -पोंबुर्पा येथे एक बांधकाम साईट सुरु असून ती अवैध असल्याने कोर्टाने त्यावर स्टे आणला होता. या बांधकामासाठी झारखंडमधील जवळपास १५-२० मजुरांचा गट कार्यरत होता.

कोर्टाने बांधकामावर स्टे आणल्यावर त्या पीडित मजुराने झारखंडला घरी जण्यासाठी सहकाऱ्यांकडे पैसे मागितले. याच विषयावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर पुढे मारहाणीत झाल्याची माहिती त्या मजुराने दिलीय.

दरम्यान संबंधित मजुराने नदीकाठच्या घराचा आसरा घेतल्यावर तेथील स्थानिकांनी त्याला धीर देत जेवण- पाणी देऊन त्याला घरात बसवले.

झालेल्या मारहाणीत त्या मजुराच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या उजव्या हातावर चॉपरचे वार केले असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

या सर्व घडामोडीनंतर तेथील रहिवाश्यांनी पर्वरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले असून त्या संबंधित बांधकाम साईटवरच्या मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजतेय.

गोव्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांचा हात असल्याचे निदर्शनास येत असून वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्याचं पोलिसांसमोर मोठं आवाहन तयार झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT