Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

Morjim Murder Case: मोरजी येथील वरचावाडा भागात एका 63 वर्षीय भाडेकरुची अज्ञातांनी मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Morjim Murder Case: मोरजी येथील वरचावाडा भागात एका 63 वर्षीय भाडेकरुची अज्ञातांनी मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. उमाकांत खोत (वय 63) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खोत यांच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा दावा केला. एवढचं नाहीतर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे उमाकांत खोत यांनी केलेली एक तक्रार कारणीभूत असू शकते. मोरजी (Morjim) परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर डोंगर कापणीबाबत (Illegal Hill Cutting) त्यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. डोंगर कापणीशी संबंधित काही अज्ञात व्यक्तींनी तक्रारीचा राग मनात धरुन खोत यांना निर्दयीपणे मारहाण केली असावी, ज्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपींचा (Accused) शोध घेण्यासाठी तपास पथके तयार केली आहेत. डोंगर कापणीसारख्या संवेदनशील विषयामुळे हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असल्याने पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे मोरजी परिसरात मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यांच्या जिवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT