Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

19 Year Old Arrested Sexual Assault: पडोसे-सत्तरी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Manish Jadhav

Sexual Assault Minor Goa: पडोसे-सत्तरी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत 19 वर्षीय संशयित तरुणाला बेड्या ठोकल्या.

नेमकी घटना काय?

पडोसे-सत्तरी येथील 19 वर्षीय संशयित तरुणाने एका अल्पवयीन मुलीला (Girl) लक्ष्य केले. त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिला अमानुषपणे मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीमुळे पीडित मुलीला गंभीर दुखापती झाल्या.

पीडितेच्या भावाने दिली तक्रार

घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पीडितेच्या भावाने डिचोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची लेखी तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच डिचोली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

संशयित आरोपीला अटक

डिचोली (Bicholim) पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी पडोसे-सत्तरी येथील 19 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. संशयित आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. डिचोली पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. आरोपीने हा गुन्हा कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे केला, तसेच यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे सत्तरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT