Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Mapusa Crime: उत्तर गोव्यातील म्हापसा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: उत्तर गोव्यातील म्हापसा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय व्यक्तीने १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून कोर्टानं त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लिफ्ट देण्याचा बहाणा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास घडली. पीडित मुलगा म्हापसा येथील रस्त्यावरून पायी चालत जात होता. यावेळी बस्तोडा येथील रहिवासी असलेला मॅथ्यू अल्मेडा (वय ३४) याने आपल्या स्कूटरवरून मुलाचा पाठलाग केला. पालकांच्या संमतीशिवाय आणि मुलाला आमिष दाखवून मॅथ्यूने त्याला आपल्या दुचाकीवर बसवले आणि निर्जन स्थळी नेले.

संशयित आरोपीने मुलाचे वय कमी असल्याचे माहीत असूनही त्याच्याशी अश्लील चाळे केले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलाने या प्रकाराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला धमकावले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने घरी जाऊन आपल्या पालकांना सर्व घडलेली घटना सांगितली. पालकांनी वेळ न घालवता म्हापसा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

म्हापसा पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून तातडीनं तपास चक्रावली आणि आरोपी मॅथ्यू अल्मेडा याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO Act) कडक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 

अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

गोवा वीज विभागाचा अलर्ट! उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' भागांत वीज पुरवठा खंडित; दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

SCROLL FOR NEXT