Karnataka tourists assault local Mapusa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: म्हापसा टॅक्सी स्टँडवर पर्यटकांची गुंडगिरी! किरकोळ कारणावरून स्थानिकाला शिविगाळ करत मारहाण, कर्नाटकचे 7 जण ताब्यात

Karnataka tourists assault local Mapusa: गोव्यातील म्हापसा येथील टॅक्सी स्टँड परिसरात गुरुवारी एका किरकोळ अपघातावरून मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: गोव्यातील म्हापसा येथील टॅक्सी स्टँड परिसरात गुरुवारी एका किरकोळ अपघातावरून मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटकहून आलेल्या १० ते १२ पर्यटकांच्या गटाने एका स्थानिक रहिवाशाशी हुज्जत घालत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत सात पर्यटकांना ताब्यात घेतले आहे.

अपघातावरून वादाची ठिणगी

मिळालेली माहिती अशी की, म्हापसा टॅक्सी स्टँडजवळ दोन वाहनांमध्ये किरकोळ धडक झाली. हा अपघात फारसा गंभीर नव्हता, मात्र त्यानंतर दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरू झाली. कर्नाटकच्या पासिंग असलेल्या कारमधील पर्यटकांनी स्थानिक व्यक्तीशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि शारीरिक हल्ल्यात झाले. पर्यटकांच्या मोठ्या गटाने स्थानिकाला धक्काबुक्की केल्याने प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय दंड प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम १५१ अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून स्थानिकांना मिळणारी वागणूक आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. म्हापसा पोलिसांनी पर्यटकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Political Crisis: पाकिस्तानात पुन्हा लष्करी बंडखोरीची चाहूल, शाहबाज शरीफ सरकार संकटात; काय घडतयं नेमकं?

सिक्स पॅक, मजबूत शरीर... तरीही वयाच्या 35 व्या वर्षी मृत्यू! एका वर्षात 56 बॉडीबिल्डर्सचं निधन; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket: 'ते सवलतीच्या गुणांनीही पास होणार नाहीत', WTC मध्ये पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था! आकाश चोप्रानं उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

POCO Smartphone Launch: बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! POCO चा 8000mAh बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Goa Tribal Employees: गाडी, माडी अन् बायकोची गोल गोल साडी! गोविंद गावडेंचा टोमणा अन् 'उटा'च्या 10 टक्के वर्गणीचा थेट हिशोब

SCROLL FOR NEXT