Goa Medical College incident Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद, मृतदेहाजवळ रक्ताचे डाग; गोवा मेडिकल कॉलेजबाहेर आढळला अज्ञात मृतदेह

GMC Dead Body Case: सध्या आगशी पोलिसांनी या प्रकरणाबद्दल गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर एका बंद दुकानासमोर मृतदेह आढळल्याने रविवार (दि.१३) रोजी बांबोळी परिसरात खळबळ निर्माण झाली. मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखमा असल्याने हा मृत्यू नेमका खून आहे की नेमकं प्रकरण काय हे शवचिकित्सेनंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिलीये. सध्या आगशी पोलिसांनी या प्रकरणाबद्दल गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

रविवार (दि.१३) रोजी दुपारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाजवळ असलेल्या एका बंद दुकानासमोर एक अज्ञात मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव संतोष कांबळे (५०, बेळगाव) असे असून त्याच्या मृत्यूचा उलघडा अजून झालेला नाही.

पोलिसांना मृत व्यक्तीच्या डोक्यावर काही जखमा आढळून आल्यात आणि त्याच्या शेजारी एक दारूची बाटली देखील आढळली आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल हे देखील घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर श्वानपथकाच्या साहाय्याने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली .

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संतोष कांबळी हा मूळ बेळगावचा रहिवासी होता, जो गेल्या काही दिवसांपासून पणजी येथील सांताक्रुझ परिसरात पत्नीसोबत राहायचा. पत्नीसोबत दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर तो दुकानाच्या बाहेर झोपायचा.

गोवा पोलिसांना घटनास्थळी काही रक्ताने माखलेले दगड आणि आजूबाजूला रक्ताचे डाग आढळले आहेत. पंचनामा झाल्यानंतर सध्या हा मृतदेह बांबोळीतील शवघरात ठेवण्यात आलाय तर शवचिकित्सेनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलीस म्हणाले आहेत. उपनिरीक्षक दीपिका परवार या एकूण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT