Maharashtra Tourist And Security Staff Clash In Calangute
कळंगुट: सोशल मीडियावर नुकताच गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचा मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कळंगुटमधील आहे. महाराष्ट्रातून आलेले पर्यटक आणि आसामच्या सुरक्षा रक्षक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
महाराष्ट्रातील पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. कळंगुटमधील हॉटेलमध्ये त्यांनी स्टे केला होता. चेकआऊटदरम्यान नीरज चौधरी इतर चार जण आणि सुरक्षा रक्षक गुलजार अली आणि मुसाबीर हुसेन यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. नीरजला दगड मारण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली. कळंगुटमधील या हिंसक बाचाबाचीविषयी पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. पोलिसांनी नीरजसह त्याचे चार मित्र आणि सुरक्षारक्षक यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास एएसआय एन.व्ही. साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. याचदरम्यान पर्यटक आणि स्थानिक यांच्यातील अशाप्रकारचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.