Fake Finance Company Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा बनाव करत गंडा घालण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रातील 5 ठगांना अटक

Fraud in Goa: उत्तर गोवा पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत त्यांना पाचही जणांना अटक करण्यात यश मिळालं आहे

Akshata Chhatre

बार्देश: मुथूट फायनान्सचे प्रतिनिधी म्हणवत अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचे नेतृत्व करणाऱ्या महाठगाचा यापूर्वी देखील नऊ गुन्हेगारी प्रकरणांचा इतिहास आहे. या टोळीमध्ये एकूण पाच जणांचा समावेश होता आणि उत्तर गोवा पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत त्यांना पाचही जणांना अटक करण्यात यश मिळालं आहे.

बार्देश येथील रहिवासी महिला रेश्मा ओगले यांनी पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनंतर एकूण तपासाला सुरुवात झाली. रेश्मा ओगले यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार २१ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४:३५ च्या सुमारास, म्हापसा येथील मुथूट फायनान्स इमारतीजवळ एका अनोळखी व्यक्तीने रेश्मा ओगले यांच्याशी संपर्क साधला आणि तो वित्तीय संस्थेचा कर्मचारी असल्याचा खोटा दावा केला.

त्याने रेश्मा यांना सोन्याचे आश्वासन देऊन भुरळ घातली आणि १,००,००० रोख रक्कम देण्यास प्रवृत्त केले. ओगले यांना स्वतःची फसवणूक होत असल्याचा अंदाज येताच त्यांनी प्रतिकार करायला सुरुवात केली मात्र या ठगाने जबरदस्ती करत तिथून पळ काढला.

पीडित महिलेने म्हापसा पोलिसांकडे याची तक्रार नोंदवताच पीआय निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली तातडीने विशेष तपास पथक तयार करण्यात आले. इतर अधिकाऱ्यांच्या सहाय्याने टीमने आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले आणि गुन्हेगारी कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली, यानंतर पोलीस गुन्हेगारांना ओळखण्यात आणि पकडण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी मनीष शशिकांत आंबेकर (४७ – टोळीचा म्होरक्या), शिवम मनीष आंबेकर (२४), रवी श्रीपती चव्हाण (४२), करण रवी चव्हाण (२०) आणि यश रवी चव्हाण (२०) यांना अटक केली आहे आणि सर्व आरोपी व्हीटीसी पळस्पे, पनवेल, रायगड, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.

तपासादरम्यान, पोलिसांनी ५९,5५०० रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले मोबाइल हँडसेट आणि एक महिंद्रा बोलेरो जीप (MH-11-DD-2753) जप्त केली आहे ज्याचा चोरांकडून वापर फसवणुकीसाठी करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT